- डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतील युवा संगम कार्यक्रम राज्यासाठी पॅटर्न ठरणार
- इतिहासाची प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घेणारा युवा संगम
महाराष्ट्राला आणि देशाला समृद्ध व प्रेरणादायी इतिहासाची मोठी परंपरा आहे. या इतिहासातून स्फूर्ती घेऊन येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी निरोगी व समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी संत परंपरेची महती सांगणारा राज्यघटनेचा व लोकशाहीचा विचार घेऊन समाजामध्ये काम करावे. यासाठी कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून झालेला युवा संगम हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी पॅटर्न ठरणार आहे.





सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसाचा युवा संगम हा कार्यकर्ता शिबिर व संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 560 युवक व युवतींनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेतील गटनेते तथा माजी मंत्री आमदार सतेज पाटील, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार , एन एसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, सौ दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ जयश्रीताई थोरात, युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन, ऋषिकेश पाटील, बालाजी गाडे, संग्राम खोपडे गिरीजा पिचड ,राहुल उगले यांसह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.





560 युवक कार्यकर्त्यांच्या साठी अत्यंत सुंदर बैठक, व्यवस्था व्यासपीठ, एलईडी व्यवस्था, प्रश्न उत्तराचे तास, विविध विषयावरील संबोधन आणि राष्ट्र प्रेमाचा विचार हे या युवा संवाद कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. लोकशाही ,राज्यघटना ,वारकरी संप्रदाय, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, देशाची उभारणी, युवकांचे योगदान या विषयावरील चर्चा करताना सध्या देशापुढील समस्या, आणि तरुणाई पुढील आव्हाने या विषयांवर चर्चा झाली.
यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी पन्नास वर्षांपूर्वी असलेला संगमनेर तालुका आज विविध क्षेत्रांमधून राज्याला दिशादर्शक ठरतो आहे. आणि यामागे सर्वांना पुढे घेऊन जाणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व असून संगमनेर तालुक्याला हे नेतृत्व मिळाले. हे संगमनेरचे भाग्य असल्याचे म्हटले असून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून भाजपा खोटी माहिती सर्वत्र पसरवत आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी ही आक्रमक होऊन त्यांना तोडीस तोड उत्तर दिले पाहिजे असे आवाहन केले.





तर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की सध्याचा काळ हा अडचणीचा आणि संघर्षाचा आहे. मात्र विचारांसाठी आणि तत्त्वांसाठी लढाई सुरू आहे. येणारा काळ हा काँग्रेसचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार म्हणाले की, स्थित्यंतरे होत राहतात .परंतु धार्मिकतेचे राजकारण पुढे करून भाजपाने देशांमध्ये द्वेषभावना वाढीस लावली आहे. काही लोक वारकरी संप्रदायामध्ये बेलगामी घुसखोरी करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तर शिवराज मोरे यांनी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता हा लढणारा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. संग्राम खोपडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले पाहिजे असे आव्हान केले. तर ऋषिकेश पाटील यांनी भाजपच्या लोकांकडून फेक निरेटिव्ह पसरवला जात असून आपण सत्य उत्तरे द्या असे सांगितले तर बालाजी गाडे यांनी ग्रामसभेमध्ये प्रत्येक युवकांनी बोलले पाहिजे असे आवाहन केले.
विविध चर्चासत्रांमधून युवकांमध्ये झालेले प्रबोधन ,त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील युवकांनी मनमोकळे विचारलेले प्रश्न हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत कॉफी विथ थोरात साहेब या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
दोन दिवस झालेल्या या कार्यक्रमात तरुणांमध्ये निर्माण झालेल्या उत्साह , राष्ट्र प्रेमाच्या विचारांची शिदोरी , आपल्या तालुक्याचा राज्याचा आणि देशाचा समृद्ध इतिहास घेऊन आपल्याला लोकशाही आणि राज्यघटनेसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचे डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले.
दोन दिवस झालेल्या या शिबिरातून संगमनेर तालुक्यातील परिवारातील सर्व युवक व युवती अत्यंत हसत खेळत विचारांची शिदोरी घेऊन रवाना झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेस,एनएसयुआय च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.
संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर ने कायम राज्याला दिशादर्शक काम केले आहे. संकटाच्या काळातही विचार व तत्वांसाठी हे नेतृत्व एकनिष्ठ असून इतिहास लढणाऱ्यांची दखल घेतो हे सांगताना डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमातून झालेला युवा संगम हा तरुणांसाठी प्रबोधन करणारा कार्यक्रम राज्यासाठी पॅटर्न ठरेल असा विश्वास राज्यभरातील सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.



