- तरुणांची ताकद बदल घडवणार ; युवा नेते अक्षय कर्डिले
गावाच्या राजकारणात मोठा बदल घडवत तरुणांनी एकमुखाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून या प्रवेश सोहळ्यामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. श्रावण रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तुषार सत्रे, आदित्य सत्रे, रोहित सत्रे, दीपक सत्रे, शुभम सत्रे, शिवाजी सत्रे, राजू सत्रे, ओमकार रायकर, जययेश साबळे, नवनाथ सत्रे, बाबासाहेब सत्रे, किरण सत्रे, गणेश सत्रे, कैलाश साबळे, अक्षय साबळे, ओमकार साबळे, शशिकांत सत्रे, लंकुष सत्रे, ओम भेलेकर आदी युवकांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करून शक्तिप्रदर्शन केले..

अक्षय दादांना विकासाचं व्हिजन आणि जनतेशी नातं
श्रावण रायकर यावेळी बोलताना श्रावण रायकर म्हणाले, अक्षय कर्डिले यांच्या कामाची गती, विकासाची स्पष्ट दिशा आणि सर्वसामान्यांशी असलेलं घट्ट नातं पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हाच योग्य पर्याय असल्याचा विश्वास आम्हाला वाटतो.

तरुणांची ताकद बदल घडवणार अक्षय कर्डिले युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात जोरदार हल्लाबोल करत सांगितले, आज पिंपळगाव माळवीतून जो संदेश गेला आहे, तो फक्त प्रवेश नाही, तर परिवर्तनाची नांदी आहे. गावागावात विकास पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. तरुणांच्या शक्तीवर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यांच्या बळावरच हा मतदारसंघ प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणार आहोत. राजकीय वर्तुळात खळबळ या सामूहिक प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गावातील तरुणांचा हा कल इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.



