- मा. खा. डॉ.सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे सर्वप्रथमच निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी पाझर आले. त्या पाझर तलावा तील पाण्याचे जलपूजन माजी खासदार आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


संगमनेर तालुक्यातील कोळवाडे, अंभो,रे डिग्रस, मालुंजे, पानोडी या गावांमध्ये दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. या सर्वच गावांमध्ये शासनाचे पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांचे कामे पूर्ण होऊन या वर्षी सर्वप्रथमच निळवंडे उजवा कालव्याला पाणी आले . अन या भागातील जनतेची पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे गावच्या पाझर तलावात आले. त्यामुळे या भागात असणारे टँकर बंद झाले आहे त्यामुळे परिसरातील महिलांच्या डोक्या वरील हंडा खाली उतरला आहे. त्यामुळे परिसरातील महिला शेतकरी समाधानी झाले आहे. जलसंपदामंत्री आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून या पाझर तलावात पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनता आनंदीत झाले आहे.
निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे पाझर तलावात .सोडले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार विखे पाटील आणि आमदार खताळ पाटील भाजपचे उपाध्यक्ष माजी सरपंच संदीप घुगे यांची सजविलेल्या गाडीतून ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. तसेच दोघांचा क्रेनच्या साह्याने मोठा हार घालून सत्कार केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुगे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, माजी सभापती अंकुश कांगणे, भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे, प्रदीप घुगे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, माजी पं स सदस्य गुलाब सांगळे, सरुनाथ उंबरकर, मालुंजे गावच्या सरपंच सुवर्णा घुगे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रवीण कानवडे, जोवर शेख, ज्ञानदेव वर्पे, शरद भालेराव, अनिल नागरे, सुरेश काळे, दिलीप वर्पे यांच्यासह जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उपअभियंता शेवाळे, माने यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावामध्ये पिण्याला पाणी नव्हते त्यामुळे महिलांना दही दिशा हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे च्या पाझर तलावात सोडण्यात आले त्यामुळे झालेल्या विजय मिरवणुकीत महिलांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.



