शनिवारी संगमनेरला ५१ कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ होणार !

संगमनेर तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, पिंपरणे या गावांत जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून मंजूर झालेल्या सुमारे ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरूवात होणार असून या कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी पिंपरणे येथे भव्य सभेने होणार आहे.

याचबरोबर उर्ध्व प्रवरा (निळवंडे) प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील मुख्य रस्ता पुलाचे बांधकाम करणे,
जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, घुलेवाडी, खांजापूर, कुरण, तळेगाव अशा दहा लोखंडी पुलाचे लोकार्पण (४ कोटी ५८ लाख), तळेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन (१ कोटी ६० लाख), मालदाड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्त्याचे लोकार्पण (१७ कोटी २९ लाख), गुंजाळवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन (१ कोटी ९० लाख), वडगाव लांडगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच निळवंडे डावा कालव्यावरील एस्केपचे भूमिपूजन (५ कोटी २१ लाख), धांदरफळ खुर्द येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा (१ कोटी ३८ लाख व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या मिर्झापूर- धांदरफळ खुर्द .या रस्त्यासाठी ६ कोटी ५९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

चंदनापुरी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन (३ कोटी ८१ लाख), हिवरगाव पावसा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन निळवंडे उजव्या कालव्यावरील 18 लोखंडी पुलांचे लोकार्पण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलांचे लोकार्पण (५ कोटी ८ लाख), तसेच पिंपळनेर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पिंपळनेर ते कोळवाडी रस्त्याचे लोकार्पण (१० कोटी ६४ लाख ) असे एकूण ५१ कोटी ३९ लाख रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार असून जाहीर सभाही होणार आहे. तरी या कार्यक्रमास वरील गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेर तालुका महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, अवजारे व स्प्रेयर ३३ लाभार्थ्यांना ३५ लाख २५ हजार रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना ८ लाभार्थी प्रतिलाभार्थी २ लाख रुपयाप्रमाणे १६ लाख रुपये आणि एमआयडीएच अंतर्गत हरितगृह व शेडनेट १४ लाभार्थ्यांना १ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान धांदरफळ येथील कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *