निधी आणणारे आमदार कोण जनतेने ओळखावे – आमदार अमोल खताळ; १ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

केंद्र व राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो, हे जनतेने लक्षात ठेवावे. या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळेच मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचलो असून विकास निधीही प्रत्येक गावांपर्यंत पोहोचविला आहे. मात्र निधी आणणारा आमदार कोण आहे हे जनतेने ओळखावे असे रोखठोक मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कासारा दुमाला गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२६) आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच राजेंद्र त्रिभुवन, उपसरपंच अमोल वाळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी उपसरपंच आशा काळे, संगीता पुंड, सपना जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक, तुळशीराम सातपुते, मच्छिंद्र सूर्यवंशी, नारायण शिंदे, अशोक सावंत, मच्छिंद्र सूर्यवंशी, दिलीप अनाप, स्वप्निल सातपुते, अशोक सावंत, अशोक जाधव, राजू गिते, सुनील सूर्यवंशी, बाळासाहेब माळी, पप्पू शिंदे, तुषार वाकचौरे, अभिषेक काळे, सचिन भरीतकर, अनिल भरीतकर, नारायण शिंदे, संतोष शिंदे, शांताराम गुंजाळ, स्वप्नील घेगडमल, जय घेगडमल, आदित्य गुंजाळ, केतन नन्नवरे, नितीन वाळके, धनंजय खतोडे, रवींद्र गुंजाळ, ग्रामपंचायत अधिकारी खैरनार आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, गेल्या एक वर्षाच्या कालावधीत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. परंतु तो निधी कोणी आणला हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात महायुतीचे कार्यकर्ते कमी पडले आहे. निधी मी देतो मात्र दुसरेच लोक त्याचे श्रेय घेतात, असा ट्रेंड संगमनेरमध्ये सुरू झाला असल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले, धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई असते. आज आमच्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या बळावर ग्रामीण भागात विकासकामे करत आहे. या गावाला एक वर्षात तब्बल १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दहशत, दबाव किंवा धनशक्तीला बळी न पडता गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा.

पदवीधर आमदारांनी संगमनेरला एवढा निधी आणला असे ते म्हणत असतील तर त्यांनी नाशिक (सिन्नर), धुळे (साक्री), जळगाव (चोपडा), अहिल्यानगर (कर्जत-जामखेड) येथे किती कोटी रुपयांचा निधी दिला हे सांगावे असे प्रतिआव्हान देत पदवीधर आमदारांचे काम केवळ पदवीधरांपुरते मर्यादित राहत आहे अशा शब्दांत आमदार खताळ यांनी पदवीधर आमदारांच्या कार्यक्षेत्रावर अप्रत्यक्ष टीका करत टोला लगावला.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असून पकडण्यात आलेल्या बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निमगाव जाळी शिवारातील दुधेश्वर वनविभागाच्या शासकीय जागेवर बिबट सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पकडलेले बिबटे पुन्हा जंगलामध्ये सोडले जाणार नाही असे सांगून ज्यांच्याकडे कोणतेही पद नसताना वनमंत्र्यांकडे जाऊन बैठका घेत फोटो काढणे म्हणजे काम पूर्ण होत नाही.

  • आ. अमोल खताळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *