भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष सोबत येत असतील तर बरोबर घ्यावे–बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राच्या बांधणीकरिता समविचारी पक्षांनी एकत्र यावे

निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या देशात भाजपचे जे लोकशाही विरोधी राजकारण सुरू आहे ते जनतेच्या हिताचे नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मित्रपक्ष बरोबर येत असतील तर त्यांना बरोबर घ्यायला पाहिजे असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकी करता ते उपस्थित होते यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मनरेगा ही गोरगरीब जनतेच्या हाताला शाश्वत काम देणारी योजना आहे. या योजनेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव दिले आहे. या योजनेतील गांधीजींचे नाव बदलले ही वृत्ती वाईट आहे. गांधीजी हे मानव धर्म सांगणारे आणि मानवासाठी आदर्श असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे नाव बदलण्याचा उद्देश काय हे कळत नाही.

 या योजनेचे स्वरूप ही बदलले आहे खरे तर मनेरगा ही यूपी अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी व तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली गरीब माणसाला हक्काचे काम देणारी अशी योजना आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ठरवलं तर गाव बदलण्याची ताकद त्यामध्ये होती. मात्र भाजप सर्वसामान्य माणसाचा विचार करत नसून पैशावर कोणीही विकत घेता येतो ही त्यांची विचारधारा आहे आणि अशा विचारधारे विरुद्ध लढताना समविचारी लोकांनी एकत्र आले तर त्यांना बरोबर घेतले पाहिजे असे ते म्हणाले. राज्यामध्ये नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने पैसा व सत्तेचा दुरुपयोग केला याउलट काँग्रेसने निर्भीळ यश मिळवले असून काँग्रेसचे यश हे लोकशाहीचे यश आहे.

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून महाराष्ट्राच्या बांधणी करता समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन करताना ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार हे पुरोगामी व गांधी विचारांची असून ते योग्य निर्णय घेतील असेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *