सामाजिक, आध्यात्मिक आणि जनकल्याणकारी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.

नरेंद्र महाराज यांनी समाजजागृती, व्यसनमुक्ती, शिक्षण, संस्कारवर्धन, आरोग्य, गौसंवर्धन आणि मानवसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या आध्यात्मिक उपक्रमांद्वारे समाजात समता, सदाचार आणि संस्कार यांची मूल्ये रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे. या सर्व योगदानांचा विचार करून त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करावा, अशी ठाम भूमिका आमदार खताळ यांनी मांडली.
महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना (ग्रामीण), आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ञ ब्लॉक मॅनेजर (BM) कर्मचारी संघटना यांच्यासह अनेक संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या न्याय्य मागण्यांवरही शासनाने सकारात्मक विचार करावा.
अमोल खताळ – आमदार, संगमनेर



