उच्च न्यायालयात एकनाथ घोगरे यांची याचिका फेटाळली; डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा !

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीवर विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी ही हरकत फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात घोगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने अॅड. विनायक होन आणि अॅड. अभय ओस्तवाल यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अॅड. सुभाष तांबे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. साहेबराव कदम यांनी काम पाहिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. राहाता सेवा संस्था मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *