तब्बल दोन वर्षांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर खासदार जेऊर मध्ये अवतरले !

  • निवडणुकीतच मतदारांची आठवण ; एक तरी विकास काम दाखवा ; मतदार सुज्ञ
  • पोकळ आश्वासनांचा उपयोग होणार नाही ; बाजीराव गवारे यांचा घणाघात !

राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. सोमवार दि.२० रोजी जेऊर येथे झालेल्या प्रचार सभेत विद्यमान खासदार यांनी भाजपवर टीका करत निशाणा साधला होता. सभेत केलेल्या भाषणावर अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे यांनी प्रखर शब्दात उत्तर दिले आहे.
अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे यांनी तब्बल दोन वर्षानंतर विद्यमान खासदारांना जेऊरगाव व नगर तालुका दिसला. निवडून गेल्यानंतर गायब झालेले खासदार पुन्हा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तरी मतदारांना दिसले हे मतदारांचे भाग्य आहे. विद्यमान खासदारांनी दोन वर्षात केलेले एक तरी काम दाखवा विनाकारण पोकळ आश्वासनाने आता मतदारांवर परिणाम होणार नाही असा घणाघात गवारे यांनी केला.


मतदार संघ तसेच तालुक्यात स्वर्गीय कर्डिले यांनी केलेली विकास कामे सर्वसामान्य जनतेला माहित आहेत. त्यामुळे स्वर्गीय कर्डिले यांनी कोणती विकास कामे केली हे कोणी सांगण्याची गरज नाही. त्यांची विकास कामे अन् जनसंपर्क यामुळे सदैव जनतेत राहणारा माणूस म्हणून स्वर्गीय कर्डिले यांची राज्यात ओळख निर्माण झाली होती.


कर्डिले कुटुंबीयांवर तसेच संपूर्ण मतदारसंघावर स्वर्गीय कर्डिले यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशाही परिस्थितीत कर्डिले कुटुंबीयांच्या पाठीशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी राहिली. कर्डिले कुटुंबीयांना बळ, आधार दिला. स्वर्गीय कर्डिले यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे अन् सर्वसामान्य जनतेचा मिळविलेला विश्वास याच बळावर अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होणार यात तीळमात्र शंका नाही.


विद्यमान खासदार लोकसभेच्या विजयानंतर कोठे गायब झाले होते. दोन वर्ष त्यांना नगर तालुका, जेऊर गट दिसला नाही. दोन वर्षात कधीही दर्शन न दिलेले खासदार निवडणुकीनिमित्त पुन्हा मतदारांसमोर अवतरले. नको त्या ठिकाणी सोशल मीडियावर मात्र त्यांचे फोटो दिसत होते. दोन वर्षात परिसरात केलेले एखादे तरी काम त्यांनी सभेत सांगणे गरजेचे होते. परंतु तसे न करता फक्त सरकारवर टीका करणे अन् मतदारांना आश्वासन देण्यात खासदार पटाईत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा पुळका दाखविणाऱ्यांनी लक्षात ठेवावे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी संपूर्ण जीवन सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी व्यतीत केले आहे. मतदार सुज्ञ झाले असून कोणत्याही भुलथापांना बळी पडणार नाही. कर्डिले साहेबांनी केलेल्या कामांची पावती म्हणून निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक करत अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वासही गवारे यांनी व्यक्त केला.

स्व.आमदार शिवाजीराव कर्डिले ‘पॅटर्न’ राज्यात ‘फेमस’ !

जनता दरबार, जनसंपर्क, विकास कामे अन् सदैव माणसात राहून समाजसेवा करण्याचा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा पॅटर्न राज्यात फेमस झाला आहे. ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल’ म्हणून स्वर्गीय कर्डिले साहेबांची ओळख होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत अक्षय कर्डिले राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांचा वारसा अक्षय सक्षमपणे पार पाडणार याचा विश्वास सर्वसामान्य जनतेला आहे. स्वर्गीय कर्डिले यांचा जनसंपर्क व विकास कामांचा पॅटर्न राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी अवलंबताना दिसून येतात. याचे फलित म्हणून अक्षय कर्डिले हे मोठ्या मताधिक्याने आमदार होणार आहेत.
– बाजीराव गवारे ( माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *