साधुसंतांच्या प्रबोधनातून हिंदुत्वाची शिकवण – आमदार अमोल खताळ

  • राहणे मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहास भेट

आमच्यासारख्या तरुणांना तुमच्या सारख्या महाराजांच्या प्रबोधनातून हिंदुत्वाची खऱ्या अर्थाने शिकवण मिळाली आहे. आज जगात इराण, इराक आणि इस्रायल या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली, तरी साधुसंतांच्या त्यागामुळे व हिंदुत्वाच्या विचारांमुळे भारताला चांगले दिवस पाहण्यास मिळत आहे आहोत असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले

संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी राहणे मळा येथील अखंड हरिनाम सप्ताह आमदार खताळ व पत्नी नीलम खताळ यांनी भेट दिली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर संभाजीनगर पैठण येथील शिवतांडव आणि बोबडी गवळण वादक संदीप महाराज खडांगळे यांच्यासह राहणेमळा सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की “तुमच्या सारख्या संतांच्या मार्गदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आम्हाला प्रेरणा देत आहे. हाच आनंद मला तालुक्यात काम करण्यासाठी ऊर्जा देतो. मी दररोज दोन ते तीन ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहास भेटी देत असतो आणि लोकांशी संवाद साधत असतो. या सर्वाच्या मागे अध्यात्मिक शक्ती महत्त्वाची आहे. अध्यात्मिक कार्यातूनच मला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते आणि समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे,” आमदार खताळ यांनी सांगितले.

हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी हरीश राहाणे, भाऊसाहेब राहाणे वैभव राहाणे, जयदीप राहाणे, गोपाळ राहाणे, विलास राहाणे, अभिजित राहाणे, संजय आखाडे, अमोल वाकचौरे,अरविंद गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज सामान्य नेतृत्व नव्हते तर ते तुमच्या आमच्यासाठी आदर्श होते त्यांनी महिलांचा सन्मान करून स्त्रीचे रक्षण केले. परंतु सध्या अत्याचाराचे आणि लव्ह जिहादचे प्रमाण वाढले आहे जो बाप आपल्यासाठी ताठ मानेने उभा आहे त्या बापाची मान कधीही खाली जाऊन देऊ नका असा सल्लाही मुलींना संदीप महाराज खंडागळे यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी राहणे मळा परिसरातील भाविकांना प्रथमच शिवतांडव व बोबडी गवळण श्रवण करण्याची संधी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मिळाली असल्याने राहणीमळा व गुंजाळवाडी करांनी त्यांचे आभार व्यक्त केले. शिव तांडव व बोबडी गवळण गायनाने सर्व भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन गेले या सप्ताहामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *