- काँग्रेसच्या अपप्रचारावर केंद्रीय कृषी मंत्र्यांचा घणाघात !
- संगमनेरात महायुतीच्यावतीने जल्लोषात स्वागत
लाडकी बहिण’ योजना ही केवळ मध्यप्रदेश व महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर ती संपूर्ण देशभरात लागू झाली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा मजबूत पाया घातला जात आहे लाडकी बहीण योजेनेबाबत काँग्रेस सह काही विरोधी पक्षाकडून जाणीव पूर्वक अपप्रचार केला जात आहे. या योजनेविषयी काँग्रेस नेत्यांनी किती ही अपप्रचार केला तरी लाडकीबहीण योजना कुणालाही थांबवता येणार नाही,असा थेट इशारा केंद्रीय कृषी आणि ग्रामीणविकास मंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी लाडकी बहीण योजनेविषयी अपप्रचार करणाऱ्यांना दिला.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहाण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नव वर्षाच्या प्रारंभाला शिर्डी येथील साई बाबांचे शनिशिंगणापूर येथील शनि देवाचे दर्शन घेऊन त्रंबकेश्वरला सह कुटुंब देवदर्शनाला जात असताना संगमनेर येथील शासकीयविश्रामगृहा वर काही काळ ते थांबले त्यावेळी भाजप शिवसेना महायुतीच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले संगमनेर तालुक्याच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ व भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांनी तर कृषी विभागा च्या वतीने संगमनेर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गीसावी तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान यावेळी भाजप शिवसेना महायुती पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
केंद्रीय मंत्री चौहाण म्हणाले की शेतकरी, रोजगार आणि गावकेंद्रित अर्थव्यवस्था केंद्रस्थानी ठेवून देशा तील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, रोजगारनिर्मिती करणे आणि गाव केंद्रित अर्थव्यवस्था मजबूत करणे हाच या ग्रामीण विकास योजनेचा उद्देश आहे .ग्रामीण विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे १ लाख ५१ हजार २८२ कोटी रुपयांचा निधी खर्चासाठी उपलब्ध राहणार असून, या निधीचा योग्य, नियोजनबद्ध व पारदर्शक वापर झाल्यास संपूर्ण ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकते, असा विश्वास मंत्री चौहाण यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या अडीअडचणीबाबत तोडगा काढणार – ना. चौहाण
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या युरियाबाबत तसेच विविध प्रश्नांबाबत आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी शेतकऱ्यांच्या आडीअडचणी बाबत केंद्रीय कृषि मंत्री शिवराज चौहाण यांचे लक्ष वेधले असता शेतकऱ्यांच्या समस्येवर गांभीर्याने विचार करून त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल,शेती, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांबाबत दीर्घकालीन व ठोस नियोजन सुरू असून, किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. आर्थिक मदत नियमितपणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महायुती च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदना वर बोलताना सांगितले.
जनसेवा हेच माझे व्रत असून जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगत मी मंत्री नाही, तर तुमचा मामा आहे असे केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी मिश्किल पणे सांगितले त्यावर माहितीचे कार्यकर्ते आश्चर्य चकित झाले.



