आ. अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून ग्रामीण विकासासाठी संगमनेर तालुक्याला अडीच कोटींचा निधी

महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विकासकामांसाठी अडीच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते सुपरफास्ट होणार असून मंजूर निधीतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत आमदार अमोल खताळ यांनी राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार तालुक्यातील २१ गावांमधील महत्वाच्या रस्त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. तसेच समनापूर येथील मारुती मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि मेंढवन याठिकाणी असलेल्या दशक्रिया घाट येथे सभामंडप बांधण्याच्या कामासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण विकास धोरणाला चालना देण्यासाठी आमदार खताळ यांची भूमिका महत्वाची ठरत आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकासकामांना शासनमान्यता मिळत असून, त्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ संगमनेर तालुक्याला मिळत असल्याने आमदार खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

महायुती सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे तालुक्यातील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. शासनाच्या योजना फक्त कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात उतराव्यात यासाठी प्रयत्न करत असून मंजूर निधीतून होत असलेली कामे तातडीने आणि चांगल्या दर्जाची केली जावी याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. नव्याने होणार्‍या कामांमुळे नागरिकांच्या आयुष्यात अधिक सुलभता येईल असा विश्वास आहे. – आमदार अमोल खताळ

आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले रस्ते

घुलेवाडी येथील लॉ कॉलेज ते एकता चौक येथे रस्ता मजबुतीकरण करणे ३० लाख, वडझरी बु. येथील बोडखे वस्ती ते धनगरवाडाकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख, समनापूर येथील मारुती मंदिर समोर परिसर सुशोभीकरण करणे १० लाख, गुंजाळवाडी येथील शिपणकर गल्ली ते दूमणे वस्ती (लक्ष्मी नगर) येथे रस्ता कॉक्रीटी करण करणे १० लाख, दरेवाडी येथील पाझर तलाव ते गायकवाड वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख, चिकणी येथील रायदुर्ग परिसर येथे रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख, धांदरफळ बु. येथील डेरेवाडी फाटा ते शीतल ओढा येथे कॉक्रीटीकरण रस्ता करणे १० लाख, वडगाव पान फाटा येथील ग्रामपंचायती च्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे १० लाख, येथील गावठाण ते बिरोबा मळा येथे रस्ता मजबुतीकरण आणि कॉक्रीटीकरण करणे १० लाख, निमगाव भोजापूर येथील किरण कडलग ते सुनील बांगर वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण करणे १० लाख, गुंजाळवाडी येथील हॉटेल गॅलेक्सी ते कमलेश तिवारी यांच्या वस्तीपर्यंत रस्ता मजबुती करण काँक्रीटीकरण करणे १० लाख, मेंढवन येथील दशक्रिया घाट येथे सभामंडप बांधणे १० लाख, मंगळापूर येथील गावठाण ते महादेव मंदिर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, मालदाड येथील शेलार वस्ती गोफणे वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण १० लाख, रणखांब येथील गावठाण ते मनसुख वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण करणे १० लाख रायते येथील प्रवरा पूल ते परसराम काळे वस्ती येथे रस्ता काँक्रीटी करण करणे १० लाख, देवगाव येथील गावठाण ते नालकर वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण / कॉक्रीटीकरण करणे १० लाख, करुले येथील निळवंडे शिव रस्ता येथे रस्ता मजबुतीकरण कॉक्रीटी करण करणे १० लाख, शिरसगाव येथील गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण आणि कॉक्रीटीकरण करणे १० लाख, पारेगाव खुर्द ता. संगमनेर येथील गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण आणि कॉक्रीटीकरण करणे १० लाख, अंभोरे येथील गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण काँक्रीटीकरण करणे१० लाख, गुंजाळवाडी येथील लक्ष्मी स्टील ते टाकेश्वर मंदिर (हासे पाटील इस्टेट) रस्ता मजबुतीकरण कॉक्रीटीकरण करणे १० लाख, आणि पिंपळे येथील गावठाण ते कोटकर वस्ती रस्ता मजबुती करण कॉक्रीटीकरण करणे २५लाख असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता या गावातील रस्त्यांच्या कामाला गती येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *