- सकल हिंदू समाज व वराह प्रतिष्ठानच्यावतीने वराह जयंती साजरी
संगमनेर शहरातील अकोले रोडवर सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वराह जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार खताळ बोलत होते, यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, प्रकाश पवार, साजन कतारी, महेश बागडे, योगेश दुसाने, रणजित शिं,दे शंकर पवार, अक्षय धुमाळ, शेटीबा पवार, कपिल पवार, शशिकांत पवार व पांडुरंग शेलार यांसह सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, हिंदू धर्मात वराह जयंतीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ही जयंती सर्वत्र साजरी केली जात असते, भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार हा भगवान वराहचा अवतार आहे, हिरण्याक्ष या राक्षसाने पृथ्वीला (भूमि देवीला) पाताळात नेले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून महासागरात उडी मारली. दातांवर पृथ्वी उचलून तिला सुरक्षित स्थानी ठेवले अन हिरण्याक्षाचा वध करून धर्म व न्यायाचा विजय केला. धर्माचे रक्षण अन अधर्माचा नाश हा विष्णूंच्या प्रत्येक अवताराचा उद्देश असल्याचे सांगून ते म्हणाले की वराह आवतार आपल्याला शिकवतो की अन्याय,अत्याचार,अधर्म कितीही बलाढ्य असले तरी शेवटी सत्याचा व धर्माचाच विजय होतो. भारतीय पुराणांमध्ये भूमीला माता मानले आहे. वराह आवतारच्या माध्यमातून मातृभूमीच्या रक्षणाचा संदेश दिला जातो. भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा या रूपातील आधुनिक “हिरण्याक्षा”ना पराभूत करण्यासाठी समाजात धर्म, सत्य, सदाचार यांचा अवलंब करणे आवश्यक असून भूमातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करून पर्यावरनाचे संवर्धन करावे असे प्रतिपादन आ. अमोल खताळ यांनी केले
स्वामी जयंती निमित्त मिरवणूक
वराह जयंतीच्या निमित्त ढोल ताशाच्या गजरात आणि सनई-चौघड्याच्या स्वरात बॅन्जो व डीजेच्या दनदनाटात अकोले रोडवर आ. अमोल खताळ यांच्या शुभहस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर ही मिरवणूक बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, चावडी, मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ पोहोचली आणि इथं या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवान वराह स्वामींची प्रतिमा होती या मिरवणुकीत वराह समाजबांधवांचे नृत्य खास आकर्षण ठरले.



