जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर या शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गातील अत्यंत गुणी विद्यार्थिनी समृद्धी अमित धुळगंड हिचा आज वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मित्र यांनी शुभेच्छा दिल्या.

समृद्धी अमित धुळगंड ही अत्यंत हुशार गुणी आणि कलागुणसंपन्न अशी विद्यार्थिनी आहे, शालेय अभ्यास याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये तिची उल्लेखनीय कामगिरी असते. यापूर्वी झालेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये तिने केंद्र स्तर बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच समूहगीत गायन आणि समूहनृत्य या स्पर्धांमध्ये ही आपल्या गटाचे नेतृत्व करून केंद्र आणि बीट स्तरावर प्रथम क्रमांकाची कमाई केलेली आहे.
(प्रतिनिधी – रमजान शेख)



