- राज्यातील नागरिक व शेतकरी सुखी समाधानी होऊ दे खांडेश्वर चरणी प्रार्थना
यावर्षी अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरी पर्जन्य छायेच्या प्रदेशात कमी पाऊस आहे. या भागातही चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी व नागरिक सुखी समाधानी होऊ दे सर्वत्र बंधुभाव वाढू दे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी खांडेश्वर चरणी केली असून तालुक्यातील महादेव देवस्थानांसह सर्व देवस्थानांना सातत्याने निधी आदर्शवत बनवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खांडेश्वर येथे विधिवत पूजा करून प्रार्थना केली. खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ, स्वामी दयानंद गिरी महाराज, राजहंस दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ, ट्रस्टचे विश्वस्त मधुभाऊ गुंजाळ, डॉ.नामदेव गुंजाळ,रावसाहेब गुंजाळ,नबाजी गुंजाळ, अशोक गुंजाळ सर, अॅड.विठ्ठल गुंजाळ, विठ्ठल गोसावी, दशरथ बालोडे,लक्ष्मण गुंजाळ, विठ्ठल आप्पा गुंजाळ,मनोहर गुंजाळ, कैलास गोसावी,पोलीस पाटील छायाताई गुंजाळ, कमलताई अरगडे,लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संजय गुंजाळ, रामनाथ गुंजाळ,शिवाजी वर्पे,बाजीराव गुंजाळ,श्रीरंग गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, दादासाहेब रूपवते, अप्पा गुंजाळ, नारायण गुंजाळ,कपिल गुंजाळ, संदीप गुंजाळ, महेश गुंजाळ,रवी खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, खांडेश्वर हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला. ग्रामस्थांनी व विश्वस्त मंडळांनी त्याचा आदर्शवत वापर करून हा परिसर अत्यंत चांगला बनवला. शहरासह अनेक नागरिकांचे हे श्रद्धास्थान असल्याने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात या सगळ्यांची चांगली सुविधा येथे केली आहे.
तालुक्यातील खांडेश्वर,बाळेश्वर,निझर्नेश्वर,रामेश्वर, दुधेश्वर या सर्व महादेवांच्या बरोबरच विविध धार्मिक स्थळांना आपण सातत्याने निधी देऊन तेथील विकास कामे केली आहे. हा परिसर आदर्शवत बनवला.
देवस्थाने हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून मानवता व माणुसकी धर्म वाढवण्यासाठी कायम काम केले आहे. तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांसाठी सातत्याने मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून सुशोभीकरणासह विविध कामे मार्गी लागली. मात्र काही लोक आता धर्माच्या नावावर राजकारण करत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. धार्मिक पीठावरून राजकारण कोणी करू नये असे आवाहन करताना जनतेच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर लहान भाऊ पाटील गुंजाळ म्हणाले की खांडेश्वर देवस्थानचा विकास हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. कोणत्याही कामाकरता कधीही निधी मागितला त्यांनी तातडीने उपलब्ध करून दिला. वारकरी संप्रदायाचे आणि सेवेचे काम करणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात ही खरी संत परंपरेचे पाईक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी गावातील विविध नागरिक युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



