भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वेत रंगल्या बनावट ग्रामसभा

संगमनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जोर्वे ग्रामपंचायतीच्या कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर लाखोचा  भ्रष्टाचार दडपण्यासाठी विखे गटाच्या जोर्वे गांवच्या विद्यमान सरपंच सौ.प्रिती दिघे व त्यांचे पती तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे व चार ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या असणार्या कागदोपत्री बोगस  ग्रामसभा दाखविण्यात आल्या आहेत.


जोर्वे ग्रामपंचायतीच्या मासिक सभा ,ग्रामसभा न घेता बाकडे खरेदी, शिलाई मशीन वाटप, कचराकुंडी खरेदी, ग्रामपंचायत गाळे बांधणे , स्ट्रीट लाईट खरेदी, बोगस लाभार्थी निवड, कागदोपत्री वस्तू खरेदी  दाखवुन झालेल्या लाखों रुपयांच्या  अपहाराची चौकशी करण्याची मागणी पंचायत समिती संगमनेर यांच्याकडे एप्रिल 2025 मधे केली होती.‌ विविध योजनां मधे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी मागणी लोकनेते  बाळासाहेब थोरात गटाच्या ९ सदस्यांनी श्री बादशहा रामकृष्ण बोरकर (उपसरपंच) श्री .दिगंबर नामदेव इंगळे , श्री. किसन हिरामण खैरे श्री.हौशीराम लहानु दिघे श्री.संदीप नारायण काकड,  सौ. मंगल विलास काकड,  सौ  संगीता राजेंद्र थोरात, सौ. सुनिता बाळासाहेब दिघे, सौ पुनम किरण खैरे (सर्व सदस्य ग्रा.जोर्वे) व जोर्वे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देवुन केली होती..


   सन २०२३ ते २०२५ या कालावधीत विखे गटाच्या सरपंच प्रिती दिघे ,ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी पद्धतीने कारभार व भ्रष्टाचाराला  कंटाळुन तसेच मासिक सभेत कोरमच्या नावाखाली सह्या करुन घेणे व नंतर सोयीस्करपणे ठराव लिहीले जात असुन कागदोपत्री वस्तु खरेदी दाखवुन सदस्यांना विश्वासात न घेता भ्रष्टाचार केला व उघडकीस आल्याने सर्वं सदस्यांनी जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
जोर्वे ग्रामपंचायतीच्या नेहमीच्या ग्रामसभा वगळता  तब्बल आठ  ग्रामसभा पैकी तीन तहकूब व पाच बोगस ग्रामसभा कोणत्याही प्रकारचा ग्रामसभा अजेंडा, फोटो, व्हीडिओ क्लिप्स, विशेष म्हणजे महसूल,कृषि विभाग,शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्या प्रतिनिधिंनी सभेत कामकाजाचा आढावा घेवून विविध योजनांची माहीती दिली असे ठराव लिहीले आहेत.

परंतु  कागदोपत्री दाखविलेल्या ८ पैकी एकाही ग्रामसभेला वरील पैकी  एकाही विभागाच्या अधिकारी किंवा त्यांचे  प्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सही हजेरी रजि. दिसत नाही. एकदा तर  चक्क रविवारी ग्रामसभा अजेंडा  १३ ऑगष्ट २०२३ रोजी काढुन  बोगस व कागदोपत्री ग्रामसभा दाखविण्यासाठी नेहमीच्या रजि.ऐवजी स्वतंत्र बोगस हजेरी रजि.दाखविण्यात आले आहे..या ग्रामसभांच्या पैकी पहीली ग्रामसभा २ फेब्रुवारी २०२३ दाखविली .आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आवश्यक असणारी ग्रामसभा   एप्रिल व  मे  २०२३  न घेतल्याचे  नसल्याचे आढळुन आल्याने  ३० मे २०२३  तहकूब सभा दाखवुन पुर्वी झालेल्या ८ जुन २०२३ रोजी  दुसरी बोगस ग्रामसभा दाखविण्यात आली. तिसरी कागदोपत्री ग्रामसभा २३ ऑगष्ट २०२३ रोजी दाखविली . चौथी कागदोपत्री ग्रामसभा २६ जाने.२०२४ रोजी दाखविली.  प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आवश्यक असणारी ग्रामसभा एप्रिल – मे २०२४  महीन्यांत   न घेता तब्बल सात महीन्यांनंतर  पुर्वी झालेल्या ३० ऑगष्ट २०२४ या दोन्ही  ग्रामसभा दरम्यान नियमानुसार चार महीन्यांपेक्षा अधिकचे झाल्याचे लक्षात येताच  लोकसभा निवडणुक (२०२४)आचारसंहिता सुरु असतांनाच १६ मे २०२४ रोजी  पाचवी ग्रामसभा कागदोपत्री दाखविली.

विधानसभा निवडणुक (२०२४)  आचारसंहिता दरम्यान २७  नोव्हेंबर २०२४  सहावी कागदोपत्री ग्रामसभा झाल्याचे भासवितात आले आहे.सरपंच सौ.प्रिती गोकुळ दिघे  व तीन सदस्य व ईतर  विशिष्ट कुटुंबातील त्याच त्याच १०५ व्यक्तिंच्या (आडनांव- इंगळे ७, काकड ४ कोल्हे ३, क्षिरसागर ३, गाडेकर ४, राक्षे ९, दिघे ३८, जोर्वेकर ३२ , थोरात  ६, पवार १४, बससाने ४ ,मोरे ६, ईतर )सह्या खाली-वर  दिसुन प्रत्येक बनावट  ग्रामसभेला स्वतंत्र हजेरी रजिस्टर दाखविण्यात आले आहे.. तरी सदरहुन ईतिवृत नोंदवही तपासताना  ग्रामसभांचे फोटो, चित्रीकरण , संबधित विभागाचे अधिकारी यांच्या सह्या  न बघता  दोन स्वतंत्र हजेरी रजि. आढळुन आले असतांनाही जाणीवपूर्वक अधिकारी यांनी दुर्लक्ष करून संबंधितांना राजकीय दबावापोटी पाठीशी घातल्याचे दिसुन येत आहे.. किमान ग्रामसभा व मासिक सभा इतिवृत्त नोंदवही  हजेरी वही सलग लिहीलेली असावी याकडे सुद्धा तपासी अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचे दिसून येते.

अशा प्रकारे सरपंच प्रिती दिघे व ग्रामविकास अधिकारी जोर्वे यांनी समांतर ग्रामसभा दप्तर अस्तित्वात आणुन जोर्वे  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त तसेच नियमांची पायमल्ली केलेली आहे.विशेष म्हणजे कागदोपत्री दाखविलेल्या हजेरी  रजिस्टर काही सह्या बनावट ,काही दुबार,तर काही मराठी वाचता न येणार्या लोकांच्या बनावट इंग्लिश सह्या आहेत.. दोन वर्षापुर्वी कागदोपत्री खरेदी केलेले ४.१३ लक्ष रु. बाकडे तक्रार केल्यानंतर प्रा.आरोग्य केंद्र जोर्वेच्या एका खोलीत कुलुप तोंडुन आणुन ठेवले आहेत.. जिल्हा परिषद जन सुविधा निधी   मुरमी करण्याच्या नावांखाली १९ लक्ष रु अपहार झालेला आहे. मुरमीकरण दाखविले रस्ते हे कमी अंतराचे  तसेच खाजगी मालकीचे आहेत‌ , ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी भ्रष्टाचाराची चौकशी मागणी करताच रातोरात  मुरुमीकरण न झालेल्या रस्त्यांवर व कामाचे फलक लावण्यात आले.

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी खरेदी केलेल्या २.९९ लक्ष रू किंमतीच्या कचराकुंडी सहा महीन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटुनही जोर्वे गावांतील नागरिकांना मिळाल्या नाहीत.  ४.१३ लक्ष रु .शिलाई  मशिन वाटप  कोणत्याही  प्रकारचे मागणी  अर्ज न घेता मर्जीतील  विशिष्ट ५०  महीलांची  नांवे लाभार्थी यादीत लिहुन ठेवले आहेत. विशेष म्हणजे जेंव्हा जेंव्हा गैरव्यवहार केला त्या महीन्यात आर्थिक व्यवहार चेकवर  सह्या केलेल्या आहेत पण त्या महीन्याची मासिक सभा न घेता आजारी असल्याचे खोटे सांगून वेळ मारुन नेली..
   तरी  गट विकास अधिकारी  संगमनेर यांनी थातुर मातुर कार्यवाही न करता जबाबदारीने संपूर्ण गैरव्यवहाराची निःपक्ष पातीपणे चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जोर्वे ग्रामस्थ जनआंदोलन करुन प्रशासनाला जागं करेल..अशी मागणी जोर्वे ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *