नवीन लोकप्रतिनिधी कडून अपूर्ण माहितीतून जनतेची दिशाभूल

  • संगमनेर शहरासाठी मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून अद्यावत जल शुद्धीकरण प्रकल्प
  • प्रशासनावर दबाव असल्याने अनेक कामे रखडली, खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची सवय
  • मा. पाणीपुरवठा सभापतींचा पत्रकार परिषदेत नवीन लोकप्रतिनिधीवर आरोप

संगमनेर तालुक्यातील जनतेने पाठ फिरवलेल्या महायुतीच्या आभार सभेमध्ये नवीन लोकप्रतिनिधी यांनी अत्यंत अपूर्ण माहितीच्या आधारे संगमनेरची बदनामी करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून शहराला थेट पाईप लाईन योजनेद्वारे पाणी दिली असून सध्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहे. याचबरोबर नव्याने अद्यावत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निळवंडे धरणालगत 23 कोटींची मंजुरी 2 मार्च 2021 रोजी मिळवली आहे. सध्या अनेक विकास कामेही प्रशासनावर असलेल्या दबावामुळे रखडली आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती असून जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असा विश्वास नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीच्या आभार सभेमधील विविध मुद्द्यांबाबत हॉटेल सेलिब्रेशन पत्रकार परिषदेमध्ये शहराध्यक्ष तथा माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, व नितीन अभंग यांनी संयुक्तपणे नवीन लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आरोपांना थेट उत्तर देऊन अपूर्ण माहितीच्या आधारे ते जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना  ते म्हणाले की 1991 मध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष पद सांभाळले. त्यापूर्वी शहरामध्ये पाण्याची अवस्था अत्यंत वाईट होती नागरिकांना 8 ते 10 फूट खोली असलेल्या खड्ड्यातून पाणी काढावे लागत होते. पाण्याची सुविधा व्हावी याकरता डॉ तांबे यांनी प्रवरा नदीवर भूमिगत  निर्माण केला. व 1992- 94 मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला.

शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या सुविधेसाठी मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात कुठेही नाही अशी थेट पाईपलाईन योजना निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी कार्यान्वित केली. शहराला स्वच्छ व भरपूर पाणी दिले. आजही जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत सुस्थिती सुरू आहे. शहरातील सर्व नागरिकांना शुद्ध पाणीच मिळत आहे. परंतु वाढती लोकसंख्या आणि भविष्य या दृष्टी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2 मार्च 2021 रोजी निळवंडे येथील अद्यावत जलशुद्धीकरण प्रकल्पाकरता 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. विशेष म्हणजे ही मंजुरी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. यामुळे ग्रॅव्हिटी द्वारे संगमनेरकरणात थेट शुद्ध पाणी मिळणार आहे.

मात्र 2022 मध्ये सत्तांतर झाले आणि महायुती सरकार सत्तेवर आले त्यानंतर काही लोकांनी प्रयत्न करून हा प्रकल्प थांबवला. शहरात अनेक विकास कामे प्रलंबित आहे प्रशासन राज असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर दबाव आहे. नगरपालिकेने अत्यंत उत्कृष्ट काम केल्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा भाजप सरकारकडून सुद्धा गौरव झाला आहे. शहरात मोठमोठी विकास कामे मार्गी लागली आहेत. हे काही आठ महिन्यात झाली नाही ही सर्व कामे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून झाली आहे.

नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नावर आंदोलन केले की सध्याचे महायुतीचे सत्ताधारी हे काम होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव टाकतात. शहरातील खड्डे, वाढलेला कचरा नागरिकांना मिळणारे अपूर्ण सुविधा याबाबत सातत्याने आंदोलने व निवेदन दिली आहे मात्र सत्ताधाऱ्यांनी मुद्दाम ही कामी रखडवली आहेत

संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केला आहे. आणि ते हा अश्वारूढ पुतळा उभारणार आहे.

संगमनेर तालुक्यातील एमआयडीसी मध्ये 155 उद्योग कार्यरत असून यामधून साधारण 6500 नागरिकांना रोजगार मिळाला आहे .विस्तारित एमआयडीसी व्हावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे प्रयत्नशील आहे. तर नाशिक पुणे रेल्वे संगमनेर वरूनच व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने आग्रह ठेवून शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

झालेली विकास कामे संगमनेर शहर व तालुक्याचा लौकिक हा राज्यात आहे. तो सततच्या विकास कामांमुळे. महायुतीचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी कोणतेही काम केले नाही. मागील आठ महिन्यांमध्ये संगमनेर शहरांमध्ये दहशत वाढली आहे. बाजारपेठ ठप्प झाली आहे. व्यापार थांबला आहे. अस्थिरता वाढली आहे. विकास कामे करणे ऐवजी चाळीस वर्षात काय केले हा प्रश्न विचारतात मात्र तालुक्याच्या बाहेर गेली की संगमनेरची प्रगती हेच सांगतात.

अपूर्ण माहितीच्या आधारे त्यांनी काल सभेमध्ये जनतेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची पद्धती आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देऊ संगमनेर तालुक्याची बदनामी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच असून जनतेने त्यांना ओळखले आहे. आभार दौरा हा अत्यंत बटबटीत झाला असून याकडे स्थानिकांनी पाठ फिरवली होती.
त्यांच्या अशा खोट्याभुलथापांना जनता कधीही बळी पडणार नाही असेही ते म्हणाले.

  • नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स करता 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता यापैकी नवीन लोकप्रतिनिधीने 4.5 कोटी म्हाळुंगी पूला करता वापरला .मात्र वरचे अडीच कोटी कोणत्या तालुक्याला गेली हे कोणालाच माहिती नाही. येथील विकास मोडण्याचा त्यांचा प्रयत्न असून तालुक्याचा निधी बाहेर पाठवला जात आहे हे सुद्धा दुर्दैवी असल्याची टीका किशोर पवार, नितीन अभंग व सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *