आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुविधांसाठी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले, मात्र सध्या या रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी घेतली जात नसून मेडिकल व इतर सुविधांबाबत अत्यंत हेळसांड केली जात असल्याचा आरोप घुलेवाडीचे माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी केलाय.

सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पानसरे यांनी म्हटले आहे की, घुलेवाडी हे संगमनेर नंतर मोठे गाव झाले आहे, या ठिकाणी तालुक्याकरता अद्यावत असे ग्रामीण रुग्णालय लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उभारले, सर्व सुविधा निर्माण करून दिल्या. मात्र सध्या प्रशासन हे जनतेच्या विरोधी काम करत असून रुग्णांना कोणत्याही प्रकारची चांगली सुविधा मिळत नाही त्याचप्रमाणे मेडिकलच्या बाबत अत्यंत अरेरावीचे उत्तरे दिले जातात, नातेवाईकांना कोणतेही मार्गदर्शन होत नाही. अस्वच्छतेसह सर्व बाबी अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप करताना तातडीने ग्रामीण रुग्णालयात सुधारणा कराव्यात अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय.



