संगमनेर – पत्रकारिता करताना जर सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केली तर देशातील कोणतेही सरकार या देशातील लोकशाहीचे भविष्य पत्रकारीतेच्या मध्ये दडलेले आहे. ही ताकद पत्रकारीतेमध्ये आहे.
सी न्युज मराठी चॅनेलचे संचालक शिवश्री बाळासाहेब गडाख यांची आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्था, शाखा संगमनेरच्यावतीने शिवश्री राजाभाऊ देशमुख यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

देशमुख पुढे म्हणाले की,आज ग्रामीण भागातील तरुण सर्वच क्षेत्रात आपले काम दाखवुन देत आहेत. ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे.




कर्तव्य विवाह बंधनचे संचालक शिवश्री संदिप शेळके म्हणाले की, चांगले काम करणाऱ्या माणसाला योग्य माणसाच्या हातुन सन्मान मिळाला तर तो अधिक चांगले काम करतो व त्याची जबाबदारी वाढते.
मराठा पतसंस्थेचे संचालक शिवश्री काशिनाथ डोंगरे म्हणाले की, पत्रकारिता काय करु शकते याचे ताजे उदाहरण नेपाळमधील जनतेचा उठाव आहे. ग्रामिण भागातील विलास बडे यांनी शेतकरी विषय व्यवस्थीतपणे हाताळला आणि सरकारला झुकावे लागले. ही पत्रकारीतेची ताकद आहे. म्हणुन लोकशाहीत पत्रकार हा महत्वाचा कणा आणि आधारस्तंभ आहे.
शिवश्री बाळासाहेब गडाख म्हणाले की, न्यूज चॅनल चालविणे म्हणजे दिव्य परीक्षा आहे. जनता व राज्यकर्ते, शासन-प्रशासन यांना जोडणारा दुवा आहे. आज पत्रकार सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी महत्वाचे काम करतो. हे करत असताना पत्रकार हाही माणुस आहे त्याच्या प्रापंचिक गरजा भागविण्यासाठी सतत संघर्ष करुन काम मिळवावे लागते. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर तुम्हाला फार कमी यश हातात येते मात्र थांबून चालत नाही तर सातत्यपूर्ण काम करावे लागते. आणि याच कामाची पावती आपल्याला समाज आणि आपण सहभागी असलेल्या संघटनेच्या माध्यमातून मिळत असते, याचीच दाखल घेऊन व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी अत्यंत विश्वासाने आणि जिल्ह्यातील कार्यकारिणीच्यावतीने माझ्यावर अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यापुढील काळात संघटनेतील सदस्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आज जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्था संगमनेर शाखेने माझा सहृदय सत्कार केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे असंही जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सांगितलं.
शिवश्री शांताराम घूले सर म्हणाले की, मला गडाख यांच्या निवडीचा सार्थ अभिमान आहे. मराठा पतसंस्था नेहमी प्रयत्न करणारे व यशस्वी होणारे यांचा सत्कार करत असते. आपण आलात व सत्कार स्वीकारला त्याबद्दल बाळासाहेब गडाख यांचे आभार मानले.
यावेळी राजाभाऊ देशमुख, मराठा पतसंस्थेचे संचालक शिवश्री काशिनाथ डोंगरे, बी.जे. आमटे, कर्तव्य विवाह बंधनचे संचालक शिवश्री संदिप शेळके, शिवश्री शांताराम घुले, नवले सर, देशमुख, शाखाधिकारी शिवश्रीअशोक अरगडे व कर्मचारी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.



