संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे महाराष्ट्र शासन माजी वसुंधरा ६.० या अभियानांतर्गत धांदरफळ बुद्रुक गाव माझी वसुंधरा अभियान यामध्ये राज्यस्तरीय सहभागमध्ये नोंद केलेली आहे, या अगोदर विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून 15 लक्ष रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे, या अभियान अंतर्गत गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थापन करण्याकरता श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान, ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक, तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जन नियोजन संपन्न झाले.







यावेळी शाडू मूर्ती विसर्जनासाठी रामेश्वर कुंडाची निर्मिती तर निर्माल्य कलश करून जमा होणारे निर्मल्यापासून गांडूळ खत निर्मिती होणार आहे, तसेच गणेश विसर्जन होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी स्वदेश युवा प्रतिष्ठान, ग्रामपंचायत धांदरफळ यांच्यावतीने माझी वसुंधरा टीमची निर्मिती करून गणेश विसर्जनासाठी संगमनेर, अकोले पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी व्यवस्थापन करण्यात आले होते, गणेशाची आरती व्यवस्था, सूचना व्यवस्था, स्वच्छता फलक यासारख्या अभिनव उपक्रमातून हा गणेशोत्सव पार पडला.
माजी वसुंधरा या उपक्रमासाठी परिसरातील ग्रामपंचायतींना हा उपक्रम प्रेरणादायी ठरणारा आहे असे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी गणेश आरती प्रसंगी सांगितले.
या ठिकाणी तानाजी बर्डे, नवनाथ नाईकवडी, अविनाश देशमुख, मोहन देशमाने, सचिन देशमाने, भाऊराव बर्डे, दत्ता कासार, डॉक्टर संजय थोरात, पांडुरंग घोलवड, अमोल त्रिभुवन, सचिन काळे, राजेश शिंदे, मोहन देशमाने, प्रशांत देशमाने, देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष विजय कोल्हे, विजय शेटे यांनी गणेश विसर्जनाचे उत्तम व्यवस्थापन पाहिले तर हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, धांदरफळ सरपंच उज्वला देशमाने, उपसरपंच संकेत वलवे, ग्राम विकास अधिकारी सुरेश मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य मंडळ, स्वदेश युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नवनाथ देशमाने मित्रपरिवार, देवस्थान विश्वस्त मंडळ यांनी उत्तम व्यवस्थापन ठेवल्याबद्दल आलेल्या गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले.
आलेल्या भाविकांनी गणेश आरती, गणेश वंदना, गणेश गीतांनी बाप्पाचे सेवापूजन करून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. या नामघोषाने अमृतवाहिनी प्रवरा नदी परिसर बाप्पांच्या जयघोषाने आनंदी झाला होता. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान परिसरातील निसर्ग पर्यटन पाहून आलेल्या गणेश भक्तांनी समाधानाचा विसावा घेऊन गणेशाला निरोप दिला.
यावेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे, बीट अंमलदार अमित महाजन, बाळासाहेब शिरसाट, खताळ मॅडम यांनी धांदरफळ परिसरात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त दिला.



