- हनुमान जयंती निमित्त मोठ्या उत्साहात मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण संपन्न
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायखिंडी गावच्या लगत असलेल्या रामगड डोंगरावर हनुमान जयंती निमित्त महादेव मंदिर ,खंडोबा मंदिर व जाणकामाता मंदिराचा कलशारोहण काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने पूजा करून आनंदात करण्यात आला.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामगड डोंगरावर या तीन मंदिरांचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मोहनराव करंजकर, सरपंच सौ निलम पारधी, माजी सरपंच नवनाथ शिंदे, दीपक करंजकर, मारुती गांडोळे ,गोपीनाथ गांडोळे, सागर गांडोळे, सुनील पारधी, बाळासाहेब ताजनपुरे ,वसंत गांडोळे ,निवृत्ती शिंदे ,राजाराम शिंदे, चांगदेव नरवडे ,सुरेश बो-हाडे, महेश गोफने, शिवनाथ बोराडे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य दशरथ वर्पे प्रा. जी.बी बाचकर यांच्यासह ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




यावेळी महंत दयानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये रामगड या डोंगरावरती महादेव मंदिर खंडोबा मंदिर व जाणका माता मंदिराचा कालक्षारोहण व विधिवत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातील महिलांनी पारंपारिक वेशभूषा केली डोक्यावर कलश, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंग, यांच्या साथीने दिंडी निघाली मंत्रांच्या आणि राम व हनुमानाच्या उद्घोषात महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न झाले यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.




यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की , महाराष्ट्राला थोर संत , महात्मे आणि समाज सुधारकांची परंपरा आहे, वारकरी संप्रदाय हा अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांना सामावून घेणार आहे. मानवता हा धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे.जात धर्म पंथ सर्व बाजूला ठेवून मानवाच्या कल्याणासाठी संतांनी दिलेल्या विचार आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. समानतेच्या वाटेवर लोकशाहीच्या मार्गाने देशाची आणि सर्वांची प्रगती झाली असून मानवता धर्म बळकट करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर मोहनराव करंजकर म्हणाले की , लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावांमध्ये सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. रामगडाला आज प्रति पंढरपूरचे रूप आले आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा होत असून पुढील अनेक पिढ्यांच्या लक्षात राहणारा हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.
यावेळी गावातील व परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकांनी काढलेली पारंपारिक दिंडी सर्वांची लक्ष वेधून घेतली होती.



