सेवा समितीची स्टंटबाजी म्हणजे गरीबांचे भवितव्य अंधारात ठेवण्याचा डाव

  • संगमनेरचा विकास सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक रोखला.
  • शिवसेना महायुतीच्या सामाजिक कार्यकर्त्या पुनम अनाप यांचा आरोप

संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात सध्या सुरू असलेली तथाकथित सेवा समितीची “नवीन स्टंटबाजी” ही कौतुकास्पद आहे असा काही जणांचा गोड गैरसमज झाला असला, तरी प्रत्यक्षात हा प्रकार सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना कायम गुलामगिरीत ठेवण्याचाच प्रयत्न असल्याचा घणा घाती आरोप शिवसेना महायुतीच्या सामाजिक कार्यकर्त्या पुनम अनाप यांनी केला आहे.


संगमनेर नगरपालिका निवडणुकित मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर कसा करण्यात आला, सामान्य नागरिकांना कशाप्रकारे वापरले गेले आणि पुन्हा एकदा गरीब माणूस गरिबीतच कसा अडकवून ठेवता येईल हेच यांचे राजकारण असल्याची टीका करत अनाप म्हणाल्या की झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना निवडणुकी च्या काळात मतासाठी पैसे देऊन वर्षानुवर्षे त्यांना त्याच झोपडपट्टीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.आरक्षणाच्या नावाखाली नागरिकांना मालकीहक्कापासून वंचित ठेवून ज्यांच्या घरांवर आरक्षणे होती, ती आरक्षणे कायमस्वरूपी त्याच आराखड्यात ठेवून संबंधित नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मालकी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. याचबरोबर शहरातील तरुण युवकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १० ते १२ हजार रुपयांच्या पगारावरच मर्यादित ठेवून मोलमजुरी करण्यास भाग पाडले गेले. सत्ताधाऱ्यांचे गुलाम बनून फक्त त्यांचीच भाकरी थापण्याची वेळ आज संगमनेरच्या तरुणांवर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण दिले, पण रोजगार कुठे?
संगमनेरसारख्या ठिकाणी केवळ शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या, मात्र त्या शिक्षणातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
“ खाजगी नोकऱ्यांच्या जाहिराती दिसतात का? लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या नोकऱ्या संगमनेरसारख्या शहरात का उपलब्ध करून दिल्या नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्या म्हणाल्या की शहरात केवळ रोजंदारी ३०० रुपये, ड्रायव्हर पाहिजे १० हजार रुपये महिना अशाच जाहिराती दिसत असून दर्जेदार रोजगाराच्या संधी पूर्णपणे अभावात असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेरला जाणीवपूर्वक जिल्हा होऊ दिला नाही
संगमनेर तालुका वर्षानुवर्षे सत्तेत असतानाही जाणीवपूर्वक तालुकाच ठेवण्यात आला, त्याला जिल्ह्याचा दर्जा दिला गेला नाही. जर तो दर्जा दिला असता, तर इथल्या गरीब पण कौशल्यवान युवकांना प्रगतीच्या मोठ्या संधी मिळाल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.


संगमनेरच्या एमआयडीसीच्या भीतीपोटी विरोधकांची धडपड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ अमोल खताळ यांना संगमनेर मध्ये एमआयडीसी देण्याचे शब्द दिले असल्याचे सांगत, ही एमआयडीसी आल्यास काही खाजगी संस्थांना फटका बसेल, या भीतीपोटीच अनेक वर्षांनंतर काहींना राजकारणाची आठवण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.


आमदार अमोल खताळ गोरगरिबांचा खरा कैवारी
“ श्रीमंत अधिक श्रीमंत व्हावा हा जरी विरोधकांचा अजेंडा असला, तरी गरीबातला गरीब मोठा झाला पाहिजे हा ध्यास आमदार अमोल खताळ पाटलांचा आहे,” असे ठामपणे सांगत पूजा अनाप यांनी विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करून संगमनेरला गुलामगिरीतच ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली आहे अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःच्या हक्कां साठी तसेच मुलांच्या भविष्यासाठी कुणाचेही गुलाम होऊ नका, असे आवाहन करत ज्या गुलामगिरीतून जनतेला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले, त्या महाराष्ट्रात आज खालच्या पातळीचे राजकारण पाहावे लागते, हे अत्यंत दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *