अवैध धंद्यांवर आ खताळ यांच्यामुळे पहिल्यांदाच ठोस कारवाया – घोरपडे

विरोधकांकडून आमदार खताळ यांचा बदनामीचा प्रयत्न सुरू

संगमनेर शहरात यापूर्वी कधीही न झालेल्या अवैध धंद्यांवरील कारवाया सध्या सातत्याने सुरू असून, या कार वायांमागे आमदार अमोल खताळ यांची ठाम भूमिका कारणीभूत ठरत असल्याचे शिवसेना जिल्हासमन्वयक विठ्ठल घोरपडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र ही सकारात्मक आणि धाडसी कारवाई काही विरोधकांना सहन होत नसल्याने ते जाणीवपूर्वक आ अमोल खताळ यांची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


घोरपडे म्हणाले की आमदार अमोल खताळ हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले लोकप्रतिनिधी असल्याने त्यांचे वाढते जनसमर्थन काहींना पाहवत नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगमनेर शहरात चालणारे बेकायदेशीर कत्तल खाने, अवैध धंदे व समाजविघातक कृत्यांबाबत आमदार खताळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात वारंवार आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले होते. कोणत्याही परिस्थितीत शहरा तील अवैध धंदे व बेकायदेशीर कत्तलखाने बंद झाले पाहिजेत, ही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे.


यापूर्वी शहरात सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र आमदार अमोल खताळ निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने अवैध धंद्यांवर कारवाया सुरू झाल्या असून, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. आज शहरात सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार खताळ यांच्या या भूमिके मुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले असून, त्याच कारणामुळे काहींच्या पोटात गोळा उठला आहे, असा आरोपही घोरपडे यांनी केला.आज संगमनेरची सर्वसामान्य जनता आमदार अमोल खताळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, जनतेचा हा वाढता पाठिंबा विरोधकांना खटकत आहे. त्यामुळे मुद्दामून चुकीची माहिती पसरवून आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा घाट घातला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार अमोल खताळ यांना आमदार होऊन अवघा एक वर्षाचा कालावधी झाला आहे. या कमी कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर मतदारसंघासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणण्यात आला आहे. या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अल्पावधीतच आमदार अमोल खताळ हे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र हे विरोधकांना देखवत नाही. – विठ्ठल घोरपडे (जिल्हा समन्वयक, शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *