मंत्री राधाकृष्ण विखे आणि आ. अमोल खताळ यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

समाज माध्यमातून जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याच्या कारणाने शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या नावाचा सब टायटल लावून संगमनेरचा राजू या इन्स्टाग्राम अकौंटवरून जाणीवपुर्वक बदनामी केली.यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.सदर अकौंटची लिंक सोशल माध्यमातून भाजपाचे जेष्ठ नेते अॅड श्रीराम गणपुले यांना मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेवून सदर इन्स्टाग्राम अकौंटच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

श्रीराम गणपुले यांनी दिलेल्या तक्रारीत १७डिसेंबर २०२५ रोजी मला माझ्या व्हाॅटसॅपवर संगमनेरचा राजू या इन्स्टाग्राम अकौंटची लिंक पाठवली.त्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांची बदनामी करणारे प्रसंग आणि वर्णन दाखवून दोघांची जाणीवपुर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे कारणावरून इंस्टाग्राम अकौंट चालविणार्या व्यक्ति विरोधात पोलीसांनी भारतीय न्याय संहीता ३५३(१) अन्वये गुन्हा दाखल केला असून, सदर इन्स्टाग्राम अकौंट चालविणार्या व्यक्तीं विरोधात कारवाईची प्रक्रीया सुरू केली असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *