आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या निधनान भारतीय शिल्पकलेच्या विश्वातील एक तेजस्वी अध्याय संपला आहे.राष्ट्रभावना इतिहास आणि संस्कृतीचा संदेश देणार्या अजरामर कलाकृती निर्माण करणारा शिल्पकलेचा ॠषीप्रत साधक आपल्यातून गेल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून महान कलाकाराला श्रध्दांजली अर्पण केली आहे.





आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे यांनी म्हणाले की,राम सुतार यांनी कलेच्या क्षेत्रात प्रदिर्घ असे योगदान देवून शिल्पकलेला जागतिक स्थान प्राप्त करून दिले.जिवंत शिल्पकला साकार करून महापुरूषांच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांनी जगामध्ये पोहचली.नर्मदा नदीच्या तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु आॅफ युनिटी’,संसदेतील महात्मा गांधीचे स्मारक,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वारकरी सांप्रदायाचे शिल्प उभारून भारतीय संस्कृती आणि महापुरूषांचे विचार जगात पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती मध्ये अचूक अभिव्यक्ति सूक्ष्म भावदर्शकता आणि भव्यतेचा समतोल होता.भारतीय कला परंपरेला आधुनिकतेची जोड देवून १०१वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक नव्या कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले.

शेवटच्या श्वासापर्यत शिल्पकलेतील समर्पित योगदाना बद्दल त्यांना केंद्र सरकारने पद्मभुषण आणि राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा यथोचित सन्मान केला.त्यांच्या जाण्याने शिल्पकलेच्या प्रवासातील एक साधक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.



