2024 ते 2025 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साकूर गावचे प्रथितयश व्यापारी दिनकर उर्फ बाळासाहेब रघुनाथ मैड यांचा राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील गुरुदत्त मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

उत्कृष्ट सोने तारण सेवा दिल्याबाबत दिनकर उर्फ बाळासाहेब मैड यांना संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या प्रमुख उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार आज रविवार दिं. 06/12/2025 रोजी राहुरी फॅक्टरी येथील संस्थेच्या सभागृहात देण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व संचालक मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपास्थित होते..
बाळासाहेब उर्फ दिनकर मैड हे साकूर गावातील सोन्या चांदीचे दागिन्यांचे मोठे व्यापारी आहेत. आपला पारंपारिक सोनार व्यवसायात त्यांनी साकूर परिसरात मोठं नाव कमावले आहे. आजही आपली पत आणि प्रतिष्ठा त्यांनी सांभाळून ठेवली आहे. गावात त्यांची स्वतः ची दोन दुकानें आहेत. आपली दोन्हीही मुलांनी या व्यवसायात त्यांच्या प्रमाणेच विस्वासाहार्यता कमावली आहे. अंबिका ज्वेलर्स या नावाने ते आपली आस्थापना साकूर गावातील मोक्याच्या ठिकाणी बस स्टॅन्ड च्या समोरच दोन शाखा चालवत आहे. बाळासाहेब उर्फ दिनकर मैड यांना दोन मुले आहेत. गौरव व चेतन ही दोन्हीही मुले उच्चशिक्षित आहेत. परंतु आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.
बाळासाहेब उर्फ दिनकर मैड यांनी साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेत गेली अनेक वर्षांपासून ग्राहकांचे सोने तारण करत आहेत. आपल्या कामात त्यांनी कायम पारदर्शकता ठेवली. यामुळे संस्थेची विश्वासार्हता साकूर परिसरात वाढली आहे. यामुळेच संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला आहे.
त्यांना सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात तर दिनकरराव मैड यांनी साई आदर्श मल्टीस्टेटमध्ये सोने तारणच्या माध्यमातून १० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल केली. त्यामुळे साई आदर्श मल्टीस्टेटने त्यांची विशेष दखल घेत ‘उत्कृष्ट सोनार’ म्हणून पुरस्कार देत गुणगौरव करण्यात आला.
बाळासाहेब उर्फ दिनकर मैड यांचा पठार भागात मोठा ग्राहक वर्ग आहे. अंबिका ज्वेलर्स नावाने त्यांच्या दोन फर्म साकूर गावात आहेत. त्यांचा हा व्यवसाय आपली दोन्हीही मुले यशस्वी पणे सांभाळत आहे. या दोन्हीही दुकानात प्रचंड ग्राहक वर्ग आहे. या ग्राहकांच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क पठार भागात आहे. आपल्या प्रामाणिक कामाची पावती म्हणून आज त्यांना हा पुरस्कार मिळाला असल्याचे साकूर येथील ग्रामस्थ बोलत आहे. दिनकरराव मैड यांना उत्कृष्ट सोनार पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर साकूरसह संगमनेर तालुक्यातून मोठा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(प्रतिनिधी – रमजान शेख, साकुर)



