आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा – आ. खताळ

संगमनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 13 आणि 14 महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचर सभेत आमदार अमोल खताळ यांनी विरोध कांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत ज्यांनी चाळीस वर्षे संगमनेरमध्ये सत्ता टिकवूनही विकासकामे न करणाऱ्या विरोधकांनी आता बोगस प्रचार, खोटे आरोप, बनावट नोटांचा वापर करून जनतेची दिशाभूल सुरू केली आहे तुमच्या प्रभागातील आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा असे आवाहन आमदार खताळ यांनी केले.

संगमनेर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 13 महायुतीचे उमेदवार सागर भोईर आणि साक्षी सूर्यवंशी तसेच प्रभाग क्रमांक 14 मधील महायुतीचे प्रवीण कर्पे आणि नीता मोहरीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत आमदार खताळ बोलत होती यावेळी व्यास पीठावर शेतकरी नेते संतोष रोहम  भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीराम गणपुले शिरीष मुळे शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी हिंदुत्ववदी नेते योगेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खताळ म्हणाले की लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहीण योजना सुरू केली आहे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येत आहे त्यामध्ये वाढ करण्याचा विचार महायुतीचे सरकार करत आहे, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना आणि लाडक्या शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे आमदार झाल्यानंतर अनेक अधिकारी भेटायला आले आणि “साहेब, तुम्ही चांगलं काम करता” असे कौतुक केल्याचा उल्लेख करत त्यांनी भूतकाळातील राजकारणावर निशाणा साधला.एका अधिकाऱ्याला निवडणुकीत मदत केल्याचे बक्षीस म्हणून त्यांना स्वतःचे पीए करून घेतले आणि त्यांच्याकडे मंत्रीपद असताना ठाण्याच्या बंगल्यावर बदल्यांमध्ये करोडो रुपये कमवले असाही गंभीर आरोप आमदार खताळ यांनी केला विरोधकांचा संपूर्ण भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्याची चेतावणी देत त्यांनी काही ‘व्हिडिओ पुरावे’ योग्यवेळी ते व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे संकेत दिले.

शहरातील तरुण व्यसनाधीन झाला या जबाबदार आपणच आहात आज तुम्ही सांगता तरुण व्यसनाधीन झाला. एका दिवसात झाला का? चाळीस वर्षापासून तुम्हीच पेरले होते संगमनेर मध्ये ड्रग्स प्रकरणात पकडलेला आरोपी हा तुमच्याच माजी नगरसेवकाचा नातेवाईक आहे त्याला केक भरवताना तुमचे फोटो पुढे आले आहे त्यामुळे ड्रज माफियांना कोन साथ देत होते हे संगमनेर करांना सांगण्याची गरज राहिली नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

विधानसभा निवडणुकीतील परा भवानंतर त्यांना भीती वाटली, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली, आता फॉरवर्ड ब्लॉक घेतला. त्या पक्षाचे चिन्ह घेतले आणि त्या पक्षाला बाजूला करून संगमनेर मेवा समिती पुढे करून निवडणूक लढवत आहे ही बनवाबनवी आता संगमनेरकर ओळखून आहे नगरपरिषद निवडणुकीमध्ये गेली दहा-पंधरा दिवसांपासून बनावट नोटा फिरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.मत मागताना खोट्या नोटा देतील. संगमनेरमध्ये बनावट नोटा नेमक्या कुठे बनत आहेत याचाही शोध घेतला जाईल असे त्यांनी सांगितले प्रभागातील ड्रेनेज लाईन रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले होते तुम्ही महसूल मंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकले असते परंतु जाणीवपूर्वक तुम्ही प्रश्न मार्गी लागला नाही तुमच्या बहिणीला कित्येक वर्ष नगराध्यक्ष पद दिले परंतु संगमनेर शहरासाठी शौचालय सुद्धा बांधता आले नाही अशी टीका करात आमदार खताळ म्हणाले की घुलेवाडी ग्रामीण मध्ये सोनोग्राफी व किडनी उपचार सुविधा सुरू केली आहे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात एमआरय मशीन बसविणार आहे एमआयडीसी सहा महिन्यांत आणण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे आणि तो ते नक्कीच पूर्ण करतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केल या परिसरातील नागरिकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याचाही आपण प्रयत्न करू असे आमदार खताळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *