सोशल मीडियावरती आमदार अमोल खताळ यांच्या बदनामीचा प्रयत्न !

  • पोस्ट टाकणाऱ्यांस लवकरच अटक करून कारवाई करणार – पोलिसांचे आश्वासन

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीतून एक गंभीर कटकार स्थान उघडकीस आले आहे. एका अज्ञात इसमाने Sangamner Politics या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी करण्या साठी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स टाकल्या आहेत. याप्रकरणी लवकरच पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे

सामाजिक कार्यकर्ते राहुल नंदकुमार भोईर (वय ३९, रा. इंदिरानगर, संगमनेर) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित पोस्ट्स राजकीय हेतूने बनावटरीत्या तयार करून आमदार खताळ यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पोस्ट्स द्वारे अमोल खताळ यांना खोट्या आरोपां मध्ये अडकवण्याचा कट रचला गेला असून, त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित संदेश हे अपमानजनक, संतापजनक आणि पूर्णतः राजकीय प्रेरित खोटे दावे असून, यामागे संगमनेरमधील काही स्वार्थी राजकीय शक्तींचा डाव असल्याची शंका व्यक्त होत आहे.

या तक्रारीवर पुढील तपास पोलिस करत असून, पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, अज्ञात इसम व पेजच्या मागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पोलिसांनी यामध्ये गांभीर्याने तपास सुरू केला असून लवकरच अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भोईर यांना पोलिसांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *