- ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी भर!
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि वाहतूक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर, शिंदोडी, शेडगाव, चिंचपूर, घुलेवाडी, जांबूत, दरेवाडी, रणखांब, वेल्हाळे, साकुर, बिरेवाडी, पिंपरणे, कौठे मलकापूर, तिगाव या गावांचा समावेश आहे.
यामुळे ग्रामीण नागरिकांना दररोजच्या प्रवासातील अडचणींवर मात करता येईल, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत सुलभता मिळेल आणि विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजपर्यंत सहज पोहोचता येईल. आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मोठी चालना मिळेल.
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक वस्तीपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठीच आहे.
– आमदार सत्यजीत तांबे



