देशाच्या सर्वांगीण प्रगती करता सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय क्षेत्रात चांगल्या प्रतिनिधीची गरज असते. दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता, कामाचा मोठा आवाका, प्रभावी वकृत्व,विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, अत्याधुनिक व्यवस्थापन आणि प्रशासनाची सांगड घालून समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वामध्ये आज सत्यजित तांबे यांचा राज्यातील अत्यंत प्रमुख महत्त्वाच्या नावांमध्ये समावेश आहे.

खरे तर लहानपणापासूनच सत्यजित,हर्षल , करण हे हुशार होते. तिघेही आपल्या वर्गामध्ये पहिले यायचे.माझी इच्छा होती की सत्यजित यांनी डॉक्टर व्हावे किंवा अकॅडमीक मध्ये आपले करिअर करावे.मात्र लहानपणापासूनच त्याला समाजकार्याची मोठी आवड असल्याने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतंत्र असे आपले मोठे वलय तयार केले आहे.
2004 मध्ये मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेच्या जागेसाठी मागणी केली यावेळी अत्यंत लहान वयामध्ये संगणकावर त्यांनी छान मांडणी करून माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची आढावा पुस्तिका तयार केली. व्यवस्थापन शास्त्रामध्ये तो कायम अपडेट असतो. सरळधोपट विचार न करता सातत्याने नवीन आणि वेगळा विचार करून तो अंमलबजावणी करत असतो. जगभरातील नामांकित हॉवर्ड विद्यापीठातून तरुणांचे व्हिजन कसे असावे याबाबत यंग लीडरशिपचा अभ्यासक्रमाही त्याने पूर्ण केला. याचबरोबर न्यूयॉर्क शहराचे मेयर ग्यावीन न्युसमयांच्या सिटीजन विल या शहरांच्या विकासाची आधुनिक मांडणी आणि नागरिकांचा सहभाग या बाबतचे तरुण व राजकीय नेतृत्वासाठी मार्गदर्शक ठरावे असे या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले.





राजकारण समाजकारणाबरोबर आणि या सर्व धावपळीत सुद्धा तो इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, आणि लॉ चा सुद्धा अभ्यास करत आहे. सत्यजित हे सातत्याने वाचन व चिंतन करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे आपले मतप्रदर्शन तो करत असतो. विशेषता उद्योग,शिक्षण आणि आरोग्य यावर केलेली मांडणी लोकांना खूप आवडते त्यामुळे राज्यभरात त्याचे मोठे चाहते आहेत जिकडे जाईल तिकडे त्याच्याभोवती मोठा गराडा पडतो. युवकांबरोबरच सीनियर सिटीजन सुद्धा त्याच्या या कामाबाबत अत्यंत आनंदी आणि समाधानी आहेत.प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, प्रभावी वकृत्व,यामुळे त्यांचे राज्यभरात लाखो चाहते आहेत.
तो युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना शिरपूर मध्ये आदिवासी मुलांबरोबर त्याने संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मला ज्येष्ठ नेते अमरीश भाई पटेल यांचा फोन आला. की सत्यजित तांबे यांनी अत्यंत प्रभावीपणे आदिवासी युवकांशी संवाद साधून मांडणी केली आहे. खरे तर त्याला लवकर राजकीय संधी मिळाली पाहिजे. याचबरोबर अनेकांनी मागणी केली की त्यांच्या मध्ये खूप मोठी क्षमता आहे आणि म्हणून त्याला राजकीय संधी मिळाली याकरता मी पदवीधर निवडणुकीमध्ये माझ्या ऐवजी त्यांना संधी दिली.





या संधीचे सोने करताना विधान मंडळाचे मोठे व्यासपीठ त्यांना मिळाले. विकासाची दूरदृष्टी नवनवीन गोष्टी शिकण्याची पद्धत अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे विधान परिषदेत अनेक प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. तरुणांच्या रोजगाराच्या बाबत तो सातत्याने आग्रही आहे. इंडियाबुल्स प्रश्न, नाशिक पुणे रेल्वे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जैन साधूंच्या पायी चालण्याच्या सुरक्षिततेच्या प्रश्न, युवकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळावा याकरता इनोवेशन सेंटर सुरू करण्याबाबत आग्रह, शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न हे प्रश्न मांडून त्याचा मोठा पाठपुरावा तो करत आहे.
विकासाची दृष्टी, राजकारण, अर्थकारण आणि सर्वांना सोबत घेऊन सातत्याने काम करत असतो. अशा व्यस्त जीवनात त्याच्यामध्ये असलेल्या कलावंताला तो वाव देतो. निसर्ग सौंदर्याची मोठी जाणही त्यांना आहे.





जे काम करायचे ते मनापासून आणि अत्यंत पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे करायचे की त्याची कार्यपद्धती आहे. विद्यार्थी दशेत एनएसयुआय, विविध युवक संघटना याचबरोबर युवक काँग्रेसच्या माध्यमातून झोकून देऊन त्यांनी काम केले. राज्यभर मोठा मित्रपरिवार उभा केला. तो कायम सगळ्यांच्या संपर्कात असतो. मित्र परिवाराच्या अडचणीत सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. आणि म्हणून राजकारण विरहित त्याची जीवाभावाचे अनेक सहकारी आहेत. हेच त्यांचे खरे भांडवल आहे. देशभरात मोठा संपर्क असल्याने त्याच्या खूप विविध क्षेत्रातील मान्यवरांशी ओळखी आहेत. या ओळखींचा उपयोग कोरोना संकट काळात नागरिकांना इतरत्र पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांनी केला. या काळात मदतीचे अहोरात्र काम केले. याचबरोबर लॉकडाऊन काळामध्ये आमच्या कोळवाडे येथील डोंगरावर वृक्षारोपणासाठी मोठे काम करून फादर हर्मन बाकर यांच्या स्मरणार्थ हार्मन हिल उभी केली.
जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून मी सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले यामध्ये गरीब श्रीमंत भेद राहू नये म्हणून सत्यजित ने सामुदायिक विवाह सोहळा करावा ही सूचना करताच त्यांनी ती अत्यंत मोठ्या मनाने मान्य केली.नातेवाईक, कुटुंब ,सहकारी, मित्रपरिवार या सर्वांच्या मध्ये तो अगदी चांगला रमतो. मुलगी अहिल्या हिच्या समवेतचे त्याचे वडील म्हणून नाते अत्यंत कौतुकास्पद आहे. छोट्या अहिल्याशी सातत्याने त्यांचा संवाद असतो.
साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, सहकार या सर्व विषयांची अभिरुची आहे.तरुणांसाठी रोजगार निर्मिती व त्याचा भर आहे, अर्थव्यवस्था मॅनेजमेंट या विषयाच्या तो सातत्याने अभ्यास करत असून तरुणांना यामधून प्रोत्साहित करत असतो. अवघ्या दीड वर्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघात त्याने 50 अभ्यासिका निर्माण केल्या आहेत. सत्ताधारी ,विरोधक, यापेक्षा रचनात्मक कामाला त्याने कायम प्राधान्य देऊन समाजकारण केले आहे.
देशाची प्रगती, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व याबाबत कायम अत्यंत परखड मत तो व्यक्त करत असतो. मायक्रोचीफबाबत भारताने पुढाकार घ्यावा याबाबत त्याने प्रथमता मत मांडले. हा अत्यंत मोठा विषय होता.
सोशल मीडियाच नव्हे तर प्रत्यक्ष कामातून अत्यंत मोठा गोतावळा निर्माण करणाऱ्या सत्यजित ने आज राज्यपातळीवर समाजकारणातून आपला मोठा ठसा उमटवला आहे.
परंतु आज देशातील राजकारण एका वेगळ्या उंबरठ्यावर येऊन ठेवले आहेत अशा वेळेस तरुणांना संघटित करून हा समाज बदलण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पारंपारिक पद्धतीच्या राजकारणापेक्षा अत्याधुनिक व्यवस्थापन शास्त्राने राजकारण करून या देशातील तरुणांना योग्य दिशा देऊन सदृढ समाज निर्माण करावा ही माझीच नव्हे तर आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. आणि सत्यजित तांबे हे नक्की पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.
डॉ. सुधीर तांबे – संस्थापक, जयहिंद लोकचळवळ



