बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणार – आमदार अमोल खताळ

  • पद्मानगरच्या शेकडो लाडक्या बहिणींनी बांधल्या आ. अमोल खताळ यांना राख्या

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे राज्य सरकारने धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार संगमनेर शहर व तालुक्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.


संगमनेर शहरातील पद्मानगर हिंदू तरुण मित्र मंडळ व पद्मश्री मित्र मंडळाच्या वतीने आ. अमोल खताळ समर्थक शशांक नमन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो लाडक्या बहिणींनी आ.अमोल खताळ यांना राख्या बांधत बहिण-भावाचं नातं अधिकच दृढ केलं. तुमच्या सुख दुःखामध्ये मी कायमच तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या महिला जिल्हा उपप्रमुख दिपाली वाव्हळ, चंद्रकला दासरी यांनी या भागातील समस्यांचा पाढा आमदार अमोल खताळ यांच्या समोर वाचला, त्यावर आमदार खताळ म्हणाले की, जसे तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवले तसेच तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्याच भागातील एक तरुण नगरसेवक म्हणून नगरपालिकेत पाठवा, तो तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी हर्षली चन्ना, अनिता उडता, पूजा एनगंदुल, प्रियांका गुजेटी, संगीता वलुसा, श्रध्दा कोमाकुल, पूजा श्रीराम, तुळजा श्रीराम, श्रध्दा सामल, संगीता शेराल, कविता शिरसुल्ला, वृषाली बहीरी, सुनीता चित्याळ, मनिषा चिलका या महिलांसह रविंद्र उडता, शशांक नमन, विशाल एनगंदुल, पांडुरंग शेराल, दर्शन चन्ना, कपिल शिरसुल्ला, श्रीनिवास वलुसा, कपिल चिल्का, सिद्धांत दासरी, अविनाश सामल, शुभम दुस्सा, शुभम चित्याल, शुभम चन्ना, शाम वलुसा, सिद्धांत बोद्दुल, आनंद सामल, विजय बहिरी, गिरीश आडेप, भीमाशंकर पडवळ, शुभम कोकणे, ओम गिल, पद्मश्री मित्र परिवार, पद्मानगर हिंदू मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मला सख्खी बहीण नाही, त्यामुळे प्रत्येक रक्षाबंधनला मला माझी मावस बहीण, चुलत बहीण ओवाळायला यायच्या, त्यांची वाट पहावी लागत होती परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर माझ्या एवढ्या लाडक्या बहिणींनी मला राख्या बांधून बहिण-भावाचं नातं घट्ट केलं त्यांचं ऋण मी कधीच विसरणार नाही, असा आशावाद आमदार अमोल खताळ यांनी केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *