- धांदरफळ बुद्रुक येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये योगासन क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ
संगमनेर – गेल्या अनेक वर्षांपासून योगासन स्पर्धेत जगभरात महाराष्ट्र विजेता ठरत आहे, हे या स्पर्धांचे यश आहे. त्यामुळे योगासनांना शासन स्तरावर अधिक सुविधा व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योगा परिषद यांच्यावतीने आयोजित ६ व्या महाराष्ट्र राज्य योगासन क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ म्हणाले बोलत होते.
योगासनामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा मोलाचा वाटा आणि उद्योजक डॉ. संजय मालपाणी यांचे योगासनामध्ये अमूल्य असे योगदान असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव राजेश पवार, खजिनदार कुलदीप कागडे, निरीक्षक अभिजीत बोस, डायरेक्टर उमेश सोटींग, महेश कुंभार, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, मुख्य योगा प्रशिक्षक मंगेश कोपकर यांच्यासह इतर मान्यवर, खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत ३६ जिल्ह्यांतील सुवर्ण पदक विजेते ६२० स्पर्धक, ७२ कोचेस, ६६ जजेस व ७२ पदाधिकारी असे ८३० स्पर्धक सहभागी झाले होते. १० ते १४ व १४ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या विविध गटांमध्ये पारंपारिक व आर्टिस्टिक योगासनांच्या १० प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली.



