संगमनेर – तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मंगळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का वाळे हिचे घवघवीत यश !

आदिवासी, दलित आणि श्रमिकांचे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी १२ ऑगष्टला काशेश्वर विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांमधून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तर या स्पर्धेत इयत्ता सातवी-आठवी गटातून मंगळापूर येथील मंगळेश्वर विद्यालयातील आठवीतील विद्यार्थिनी अनुष्का रामभाऊ वाळे हिने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलाय. अनुष्का हिला विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख खेमनर यांचे मार्गदर्शन लाभले.


अनुष्काच्या या यशाबद्दल तिचे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,रजिस्ट्रार तसेच सर्व संचालक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रा.पं.मंगळापूर, मंगळापूरमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.


या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून शिक्षक सोमनाथ मदने आणि सुनीता पगडाल यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *