जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे ही आपली सामूहिक जबाबदारी – आमदार अमोल खताळ । कारगिल दिनानिमित्त तळेगावाला ध्वजारोहण आणि वृक्षारोपण

भारतीय सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची पर्वा न करता, ऊन-वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबापासून दूर राहून या देशाचे रक्षण करत आहेत. या जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.


तालुक्यातील तळेगाव दिघे येथे कारगिल दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ. खताळ यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण अर्पण करून अभिवादन केले. माजी सैनिक व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी मेजर राजेंद्र गुंजाळ, मेजर रामनाथ दिघे, सुनील दिघे, भाऊसाहेब दिघे,आबासाहेब भागवत, महेश दिघे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, सोपान कांदळकर, तात्यासाहेब राहणे, संदीप क्षीरसागर, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप नेते अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, पंढरीनाथ इल्हे, रवींद्र दिघे, रामदास दिघे, संजय कवडे, निलेश दिघे, डॉ संतोष डांगे, उत्तम दिघे, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर जानेकर, राजेश दिघे, अतुल कदम, गोरख ईल्हे, राहुल उकिर्डे, अशोक दिघे, विलास दिघे, विनायक कांदळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार खताळ म्हणाले की, आपण सुरक्षितपणे आपले जीवन जगत आहोत, त्यामागे या जवानांचे अमूल्य योगदान आहे. मात्र काही गावांत दुर्दैवाने जवानां च्या कुटुंबीयांना समाजाकडून त्रास दिला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आजच्या कारगिल विजय दिनी प्रत्येकाने भारतीय जवानांची सेवा ही केवळ सीमे पुरती मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाचा आदर राखणेही आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले

  • तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी आमदार अमोल खताळ यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर कारगिलदिना निमित्त बिरोबा मंदिराच्या परिसरात आ. खताळ आणि माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी गावातील वृक्षप्रेमी नागरिकांनी घ्यावी असेही आवाहन आमदार खताळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *