सात्विक डोअर्स इंडस्ट्रीजचे संचालक अमोल दाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला, वाढदिवशी सकाळी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी परिसरातील जीवदया पांजरापोळमध्ये जनावरांना चारा भरवत सपत्नीक वाढदिवस साजरा केला तर सायंकाळी रायतेवाडी फाटा येथील संतोष पवार यांच्या अनाथ मुलांच्या आश्रमात मुलांना खाऊ आणि अन्नदान करत आपला वाढदिवस साजरा केला, येथील साईबाबांची आरती करत बाळगोपाळांनी टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करत अमोल दाते यांचे आभार मानले तर दाते यांनी या अनाथ मुलांसोबत सपत्नीक केक कापून आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.

अमोल दाते यांनी सात्विक डोअर्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोठा नावलौकिक मिळवला असून त्यांचा मोठा मित्रपरिवारही आहे तर वाढदिवशी आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी नीलमताई खताळ यांनीही अमोल दाते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात,यावेळी माधुरी अमोल दाते यांनी नीलमताई खताळ यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले, त्याचबरोबर एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनीही फोनवरून दाते यांना शुभेच्छा दिल्यात.

सायंकाळी पार पडलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला संपूर्ण दाते परिवार, मित्रमंडळी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांची हजेरी होती, या सर्वांसमवेत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
दिलदार, सहकार्याभिमुख, सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले अमोल दाते हे नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात तर वाढदिवशी होणारा वायफळ आणि अनाठायी खर्च टाळत ते सामाजिक उपक्रम राबविण्यास पसंती देतात आणि अशाच पद्धतीने यंदाही अमोल दाते यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय.



