पुण्यातील गंज पेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य समारंभात ‘अहिल्यारत्न पुरस्कार 2025’ चे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. हा सोहळा अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला वंदन करत समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तेजस्विनींना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

कर्तृत्व, धैर्य, सेवा, नेतृत्व आणि सामाजिक भान या मूल्यांचा पुरस्कार देत स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला. समाजपरिवर्तनासाठी सत्तेची नव्हे, तर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास या गुणांची आवश्यकता असते, हे या तेजस्विनींनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. समाजहितासाठी आणि लोकसेवेच्या भावनेतून त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा पुरस्कार कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील एकूण ३०० महिलांना या वर्षी ‘अहिल्यारत्न पुरस्कार 2025’ सन्मानाने गौरवण्यात आले. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लता शिंदे यांचा विशेष उल्लेख करता येईल. त्या अनेक वर्षापासून ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत आहेत. सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान लक्षणीय असून, त्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात स्त्री-सक्षमीकरण आणि समाजकल्याणासाठी कार्यरत आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मान्यवर उपस्थित रामहारी रुपनवर – आमदार, महाराष्ट्र विधान परिषद, डॉ. नितीन वाघमारे – आयकर आयुक्त, पुणे, प्रा. डॉ. महेश थोरवे – संचालक, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे, मा. दीपकजी राहीज – ज्येष्ठ समाजसेवक, पुणे, मा. बाळासाहेब झोरे – कुबेर फायर इंजिनिअरिंग, पुणे, मा. अजय दूधभाते – अध्यक्ष, अहिल्यादेवी सेवा संघ, पिंपरी-चिंचवड, मा. बाळासाहेब कर्णवर पाटील – चेअरमन, श्री सद्गुरू साखर कारखाना, मा. राजू दुर्गे – माजी नगरसेवक, पिंपरी-चिंचवड, मा. हनुमंतराव धुमाळ – उद्योगपती, पिंपरी-चिंचवड, मा. अशोकराव पवार – ज्येष्ठ सामाजिक सेवक, मुंबई, श्री महेश इनामदार – रिजन हेड, सेंटर्ड क्लब ट्रस्ट, पुणे, मा. प्रवीण काकडे – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली, मा. शेशिराव शेंडगे – चेअरमन, स्वामी विवेकानंद पतसंस्था, कोल्हापूर उपस्थित होते. तर कार्यक्रमात पल्लवीताई शेलार, राजू शिंदे, दादाहरी शिंदे, छायाताई आहेर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अहिल्यादेवींच्या विचारांचा वसा पुढे नेत, समाजात परिवर्तन घडवणाऱ्या या तेजस्विनींचा सन्मान केवळ एक पुरस्कार नव्हे, तर समाज बदलण्याच्या प्रक्रियेत त्यांनी दिलेल्या योगदानाची जाहीर पावती होती.



