- वडगावपान( साईनगर) येथील हरिनाम सप्ताहाची सांगता
साधू-संतांच्या शुभ आशीर्वादाने मला कमी वयात, कमी वेळेत सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती संधी कधीही वाया जाऊ देणार नाही. धर्मकार्य आणि साधू-संतांच्या कार्याला माझा हात कधीही आखडता राहणार नाही असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.




संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे मळा (साई नगरमध्ये ) श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रामायणाचार्य रामराव महाराजढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने व दहीहंडी फोडून करण्यात आली. या सांगता सोहळ्यात आ. खताळ बोलत होते. याप्रसंगी वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, मदन महाराज पारख, वसंत महाराज गुंजाळ, केदार भंडारी, अण्णासाहेब सदाफळ, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, गणेश काशीद, समीर मोरे यांच्यासह वडगाव पान परिसरातील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगमनेर तालुक्याच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सन्मान करण्यात आला तर ढोक महाराज यांच्या हस्ते आ. अमोल खताळ यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार खताळ पुढे म्हणाले की, वडगाव पान येथील साई नगर येथे गेली ४२ वर्षापासून सातत्याने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक महाराज या सप्ताहासाठी येत असतात, त्याचा मी साक्षीदार आहे. माझी आई नित्यनियमाने पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वरची प्रत्येक वर्षी वारी करत आहे. त्यामुळे आपणही या वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो आहे. रामराव महाराज ढोक यांच्या प्रबोधनात्मक किर्तनातून खऱ्या अर्थाने समाजाला दिशा मिळते. मी अनेक वेळा त्यांच्या कीर्तन व प्रवचनांचा लाभ घेतला आहे. अशा अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन आणि कीर्तनातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यातून तरुण वर्गाला एक वेगळी दिशा मिळत असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.
या सप्ताह यशस्वीतेसाठी सुधाकर गडगे, अभिजित गडगे, पंकज गडगे, भाऊसाहेब गडगे, राहुलगडगे, हर्षद गडगे, शिवम गडगे, प्रदीप गडगे, नारायण गडगे, राजेंद्र गडगे, किरण गडगे, अनिल गडगे, संकेत गडगे, दिगंबर गडगे, शंकर गडगे, अजय गडगे, विनोद गडगे, अशोक गडगे, सुरज कुळधरण यांच्यासह गडगे मळा परिसरातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.
- अखंड हरिनाम सप्ताहमध्ये सहभागी झालेले आमदार अमोल खताळ आणि सप्ताहाला उपस्थित सर्व भाविक भक्तांनी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या आज्ञेनुसार एका सुरात आणि एका तालात टाळ्या वाजवत पांडुरंगाची आरती करून या सप्ताहाची सांगता झाली .



