संगमनेर तालुक्यातील मनोली येथे सुरु असणाऱ्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात अबालवृद्ध, महिला-पुरुष, लहान मुले-मुली तसेच भजनी भावीक-भक्तांबरोबर आमदार अमोल खताळ यांनी फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.




मनोली येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, या सप्ताहास आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष देविदास शिंदे यांच्या हस्ते आ. अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काही आबालवृद्ध पुरुष आणि महिलांबरोबर तसेच बाल वारकऱ्यांसमवेत आमदार अमोल खताळ यांनी फुगडी खेळली.
आमच्या परिवाराला सुद्धा धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे, माझी आई प्रत्येक वर्षी वारी करते, वारीतून खऱ्या अर्थाने एक सकारात्मक ऊर्जा मिळते, तशीच ऊर्जा अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. यावेळी भाजप राज्य कार्यकारी परिषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, किसन शिंदे, रुपम गाडेकर, मछिंद्र भागवत, काशिनाथ साबळे, सोन्याबापू ठोसर, बाबासाहेब ठोसर, संदीप बेंद्रे, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, अप्पा बेंद्रे आदीसह मनोली ग्रामस्थ उपस्थित होते.



