उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा – आमदार खताळ

  • १०० बेडचे स्त्री रुग्णालय लवकर सुरू करा – आरोग्यमंत्र्यांशी बैठक

संगमनेर उपजिल्हा रुग्णालयाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे, कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर केली.

मुंबई येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार खताळ यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव विनायक निपूण इ.रवींद्र आरोग्य विभागाचे आयुक्त कादंबरी बलकवडे आरोग्य सहसंचालक डॉ.सुनिता गोल्हाइत नाशिक उपसंचालक डॉ कपिल आहेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय घोगरे यांच्यासह आरोग्य मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.


संगमनेर शहरातील कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत १०० बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरू करावे, तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी राखीव असलेले बेड प्रत्यक्षात उपलब्ध करून द्यावे, संगमनेर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम मुदत संपूनही पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्ट केले जावे, आणि उर्वरित काम नवीन ठेकेदाराद्वारे तातडीने पूर्ण करावे. संगमनेर तालुक्यातील सर्वच नागरिकांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे. तर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

संगमनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामात झालेल्या हलगर्जीपणाबाबत आमदार अमोल खताळ यांनी वारंवार आवाज उठवला आहे. “हे रुग्णालय पूर्ण झाल्यावर गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्या. त्यामुळे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणे आवश्यक आहे.आमदार खताळ हे सातत्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा वेग वाढावा, गुणवत्ता सुनिश्चित व्हावी यासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्यासाठी देखील आग्रह धरला आहे, जेणे करून लोकांना वेळेत आरोग्य सेवा मिळू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *