तालुक्याचे पाणी कुठेही कमी होणार नाही त्याची जबाबदारी माझी आहे.जामखेडच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.प्रांजली चिंतामणी यांच्या निवासस्थानी जावून मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.विजयी झालेल्या सर्व नगरेवकांना त्यांनी सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर मनोज कुलकर्णी विनायक देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड नगरपालिका निवडणुकीत सौ.प्रांजल चिंतामणी यांचा झालेला विजय सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आनंद देणारा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी सत्कारा प्रसंगी व्यक्त केली.जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला जनतेन मोठे पाठबळ दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.जामखेड नगरपालिकेत नगराध्यक्षा सौ.प्रांजली चिंतामणी आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आ.सुरेश धस यांच्या पाणी योजनेमुळे जामखेडचे पाणी कुठेही कमी होणार नाही.तालुक्यातील जनतेवर अन्याय होवू न देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.



