संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसथांब्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला निर्देश देत असल्याचे सांगितले आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षापासून पुणे नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे.

संगमनेरमधील अनेक प्रवासी नोकरी शिक्षण आणि वैद्यकीय कामासाठी पुणे नाशिक या मोठ्या शहरात जात येत असतात मात्र शिवनेरी व विना वाहक बसगाड्या संगमनेर शहरात न येता बाह्यवळण मार्गाने जात असल्या मुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेरच उतरावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत आ. अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन देऊन या प्रमुख मागणीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले
परिवहन मंत्र्यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची गंभीर दखल घेत तसेच प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन शिवनेरी आणि विना वाहक बसला संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत या निर्णया मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होऊन पुणे-नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णया बद्दल आ खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहे.



