स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच एका शैक्षणिक संस्थेला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल काँग्रेस पक्षाशी संबंधित एका ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे कोसळला होता. मात्र या पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठीआमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधी मंजूर करून घेतला. अन शाळा सुरू होण्यापूर्वीच हा पूल शालेय विद्यार्थ्यांसाठी परिसरातील रहिवाशां साठी खुला करण्यात आला.मात्र काँग्रेस पुरस्कृत असलेल्या पदवीधरआमदाराने या पुलाचे काम रखडवले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केला आहे.

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूलचे बांधकामकाम तत्कालीन खासदार स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधी तून झाले होते मात्र, पूर्णपणे सुस्थितीत असलेल्या पुलाचे जवळपास पाच फूट फाउंडेशन विनाकारण तोडण्यात आले. या पुलाच्या कामाचे कंत्राट काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ठेकेदाराला देण्यात आले होते, तर खोद कामाचे कंत्राट नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षांकडे सोपविण्यात आले होते.
ठेकेदाराच्या चुकीमुळे विनाकारण पूल पाडल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, शाळकरी मुलांना आणि वयोवृद्धांना अनेक दिवस गैरसोयीचा सामना करावा लागला. धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना जोडणारा हा पूल कोसळल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. मात्र या परिस्थितीची महायुतीच्या पदाधिकार्यांनी गंभीर तकल घेऊन ही बाब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या वेळचे भाजप विधानसभा प्रमुख, आणि सध्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली त्यांनी सातत्याने पालक मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. या परिसरातील नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी भरघोस निधी मंजूर केला.



