भोजापूर चारीचे काम करण्यात येत असलेले अपयश झाकण्यासाठीच चाळीस वर्षे पक्त निळवंडे धरणाच्या कामाचा गाजावाजा फक्त स्वताच्या राजकीय फायद्यासाठी केला का ॽ असा शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे यांनी केला.

माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना घोरपडे म्हणाले की,सर्व सतास्थाने ताब्यात असतानाही भोजापूर चारीचे काम पुढे गेले नाही.प्रत्येक वर्षी निवडणूक आली की जेसीबी आणून शेतकर्यांचे तात्पुरते समाधान करण्यात धन्यता मानणार्या नेत्यांचे चाळीस वर्षाचे अपयश उघडे पडल्या मुळेच केविलवाण्या आवस्थेतून चांगल्या कामावर टिका केली जात आहे.
महायुती सरकारमुळे निळवंडेच्या कामाला गती मिळाली.तुम्ही मंत्री होतात तरी निळवंडे धरणाच्या मुखापाशी कालव्यांची काम सुरू करू शकला नाहीत, याकडे लक्ष वेधून घोरपडे म्हणाले की,महायुती सरकारने कालव्यांची काम केलीच पाणीही आणून दाखवले. पण आता जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून भोजापूरच्या कालव्यांना निधी मिळत असेल तर तुम्हाला एवढे दुख व्हायचे कारण काय.तुमची चाळीस वर्ष आणि महायुती सरकारने एका वर्षात भोजापूर चारीला दिलेला निधी लोकांना आता चांगल्या पध्दतीने समजला असून तुम्ही कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी भोजापूर निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी महीला युवक कार्यकर्ते तुमच्या वक्तव्याला थारा देत नाही.कारण याच मुद्दयावरून तुमचा पराभव जनतेने केला आहे.भविष्यातही जनता तुमच्या सोबत राहाणार नाही.कारण चाळीस वर्षात जो न्याय तुमच्याकडून मिळाला नाही तो न्याय महायुती सरकारने दिला.
विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेन आ.अमोल खताळ यांच्या सारख्या सामान्य व्यक्तीला निवडून देवून केलेले परीवर्तन हे प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केले असून तुम्हाला तेच सहन होत नाही.त्यामुळे तुम्ही फक्त बोलत राहून टिका करत बसा महायुतीच्या माध्यमातून आम्ही अधिकचे काम करीत राहू असा टोलाही विठ्ठलराव घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.



