आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश, संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजासाठी सभागृह बांधकामास १० लाखांचा निधी मंजूर !

संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजासाठी सभागृह बांधकामास १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नाभिक समाज हा संगमनेर तालुक्यातील एक प्रगत, मेहनती आणि सामाजिक दृष्ट्या सक्रीय घटक आहे. समाजाच्या या गरजेची जाणीव ठेवून आमदार तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या निर्णयामुळे नाभिक समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी एक सशक्त मंच उपलब्ध होणार आहे. समाजातील युवकांना मार्गदर्शन, महिला मंडळांचे कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी हे सभागृह उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *