संगमनेरला चार ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयासाठी प्रत्येकी २५ लाख तर तर एक ग्रामपंचायतीसाठी २० लाखाचा निधी मंजूर – आ. खताळ

आमदार अमोल खताळ यांच्या पाठ पुराव्याने ग्रामविकासाला येणार गती

संगमनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीं कडे स्वतःचे कार्यालय नाही,आशा ग्राम पंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या अंतर्गत सावरगाव तळ निमोण झोळे सावरचोळ या ग्रापपंचायतींना प्रत्येकी २५ लाख तर दरेवाडी ग्रापपंचायतीला २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही अशा ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुदान द्यावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनीग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील  निमोण, सावरचोळ,  झोळे या चार ग्रामपंचायतींना इमारत बांधकामा साठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा तर दरेवाडी ग्रामपंचायतसाठी २० लाख रुपयांचा जाहीर केला आहे.या निर्णया मुळे गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहून ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्रता येईल. तसेच ग्रामस्थांना सेवांचा लाभ घेण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे या निधीतून पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी ती उपलब्ध करून दिल्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहे.


ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे.आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. यासोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल. तसेच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परिणामी गाव कारभाऱ्यांची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे.
अमोल खताळ- आमदार, संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *