आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीचे राजकारण करू नये

  • प्रामाणिक रामोशी समाजाबद्दल अविश्वास निर्माण करू नका
  • संगमनेर मध्ये काँग्रेसकडून कायम उमाजी राजे नाईक यांच्या प्रति आदर — ज्येष्ठ नेते देवराम गुळवे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्व समाजातील नागरिकांना बरोबर घेऊन तालुक्याची प्रगती साधी कधीही भेदभाव केला नाही. जातीयवादी राजकारण केले नाही मात्र काही संधी साधू लोक आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या जयंती वरून राजकारण करून स्वार्थ साधक असल्याची खरमरीत टीका  रामोशी समाजाचे जेष्ठ नेते देवराम गुळवे यांनी केली आहे

संगमनेर तालुका रामोशी समाज संघटनेचे  ज्येष्ठ नेते देवराम गुळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून रामोशी समाज अत्यंत प्रामाणिक राहिला आहे. संगमनेर मध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्व समाजाला बरोबर घेतले .कधीही भेदभाव केला नाही. जातीपातीचे राजकारण केले नाही. यशोधन या जनसंपर्क कार्यालयामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची जयंती साजरी केली. याचबरोबर गावी गावी जयंती साजरी करताना देश पातळीवर उमाजी राजे नाईक यांचा सन्मान व्हावा याकरता पाठपुरावा केला.

मात्र ज्यांना आतापर्यंत उमाजी राजे नाईक माहीत नव्हते अशी मंडळी स्वार्थी भावना ठेवून विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे . रामोशी समाजा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहे कधीही दगाबाजी केली नाही. नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी आमच्या समाजाला बदनाम करू नका. यामागे तुम्हाला क्रांतिकारक तरी माहिती होते का असा सवाल करताना लोकनेते बाळासाहेब थोरात आणि यशोधन संपर्क कार्यालयाने काय रामोशी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे हा समाज प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे.

आमच्या गरिबीचा फायदा घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फिरणे बंद करू असा खणखणीत त्यांनी दिला आहे. तालुका संघटनेचे पैलवान तानाजी शिरतार म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा सन्मान करत त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले. रामोजी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध विकासाच्या योजना राबवल्या. जातीपातीच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सध्या काही मंडळी फक्त भगवी टोपी घालून फिरत आहे भगवी टोपी घातली म्हणजे हिंदुत्व हे अत्यंत चूक आहे हिंदुत्व हे विचारांमध्ये असावे लागते. संगमनेर मधील हिंदू हे वारकरी संप्रदायाचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहे मात्र काही लोक आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अत्यंत चुकीच्या पद्धतीने जातीभेद करत असल्याची टीका त्यांनी केली असून अशी जातीपातीच्या नावावर गरिबांना छळू नका असेही त्यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, रमेश गफले, महेश गोफणे रोशन गोफणे सचिन गुळवे संजय चव्हाण मनोज चव्हाण सचिन बोराडे नितीन बोराडे सोमा माकरे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *