कार्यकर्त्यांचा जिव्हाळा आणि प्रेम हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद असून यातूनच खरी कामाची ऊर्जा मिळते. मोठ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणे हे आपल्याला आवडत नसून यावर्षीही अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेतील युवक आमदार सत्यजित तांबे यांची राज्यभरात मोठी लोकप्रियता आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या संस्काराची शिदोरी आणि राजकारणातील साधेपणा हा आमदार सत्यजित तांबे यांनी कायम जोपासला आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर मोठा मित्रपरिवार त्यांनी संग्रहित केला असून युवक काँग्रेसचे प्रांताध्यक्ष पद सुद्धा कार्यक्षमपणे सांभाळले आहे.
कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उत्तर महाराष्ट्रातून अत्यंत मोठ्या मताधिक्याने ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. विधान परिषदेमध्ये कृषी,शिक्षण,बेरोजगार,औद्योगीकरण,शासकीय निम शासकीय, कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते सातत्याने मांडत असून त्यांची अभ्यासपूर्ण मांडनी युवकांना भावली आहे. राज्यभर त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचे कौतुक होत असून आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून संगमनेर मध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते.


मागील वर्षी 27 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार युवकांनी स्वच्छता अभियान राबवले होते. यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करण्याचे नियोजित असून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे.
तसेच आपण सुद्धा कासावीस असल्याचे उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव होय माझा जीव कासावीस या संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देऊन सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
सध्या फ्लेक्सच्या माध्यमातून अनेक जण शहराचे विद्रूपीकरण करत आहे. जे अत्यंत दुर्दैवाचे असल्याचे त्यांनी म्हटले असून वाढदिवसाच्या निमित्ताने मी कुठेतरी कामातच व्यस्त असेल नेहमीसारखा हा माझा सामान्य दिवस असेल तेव्हा हार तुरे पुस्तके किंवा भेटवस्तू कुणीही आणू नये तसेच अनाधिकृत होर्डिंग कुठे लावू नये अशा अपेक्षाही सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली असून सर्वांचे प्रेम आहेच ते अधिक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



