स्थानिक निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहा – शिवसेना सचिव राम रेपाळे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिंदे शिवसेना पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात रेपाळे बोलत होते.

पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार असून त्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राम रेपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मित्र पक्षासोबत युती होईल अथवा होणार नाही परंतु सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन रेपाळे यांनी केले आहे.

पुढील काही दिवसात काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले जाणार असल्याचेही रेपाळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे,आमदार अमोल खतळ, आमदार विठ्ठलराव लंघे, अनिल शिंदे, सचिन जाधव, संभाजी कदम, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुनडे, सुनीता शेळके, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, महेश देशमुख, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे, सागर बेग, राजूभाऊ शेटे, मारुती मेंगाळ, सुशांत गजे, वाकचौरे, विठ्ठलराव घोरपडे, राहुल गोंदकर, योगेश जगताप,अक्षय जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *