सॅफ्रॉन उत्सव एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद, लायन्स सॅफ्रॉन सफायरचे कार्य अभिमानास्पद – आ. अमोल खताळ

संगमनेर – स्टॉलधारक उद्योजक, नवीन बाजारपेठ, प्रचंड प्रमाणात ग्राहक, फुड स्टॉल आणि गेमिंग झोन याची सांगड घालून संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिलेल्या सॅफ्रॉन उत्सव एक्स्पोचे उद्घाटन संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. सॅफ्रॉन उत्सव एक्स्पोचे हे प्रथमच वर्ष असून सफायर बिझनेस एक्स्पोच्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनदा एक्स्पोचे आयोजन लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन करत आहे. व्यासपीठावर उद्घाटक म्हणून आमदार अमोल खताळ, प्रमुख अतिथी म्हणून जीएटी कोऑर्डिनेटर सुनिता मालपाणी, प्रमुख उपस्थित म्हणून क्लबचे संस्थापक अध्यक्ष पीएमसीसी एमजेएफ गिरीश मालपाणी उपस्थित होते. प्रकल्प समन्वयक श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा, प्रकल्प प्रमुख अतुल अभंग, अध्यक्ष कल्याण कासट, पूजा मर्दा, सीए कृतिका पडताणी, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे यांनी प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली.

मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रकल्प प्रमुख अतुल अभंग यांनी सॅफ्रॉन उत्सव एक्स्पोची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. क्लबचे अध्यक्ष कल्याण कासट यांनी क्लब सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी असल्याचे सांगत पुढील प्रकल्पांचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी आणि लायन्स ग्लोबल अ‍ॅक्शन टीमच्या कोऑर्डिनेटर सुनिता मालपाणी यांनी क्लबचे अभिनंदन करताना दिवाळीच्या आधी खरेदी करण्याच्या अनुषंगाने संगमनेरकरांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. क्लबचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी उपस्थितांना सफायर एक्स्पो आणि सॅफ्रॉन उत्सवचे महत्व सांगितले. शंभर पेक्षा जास्त स्टॉल असून सुध्दा सतत चौकशी होत असल्याने सॅफ्रॉन उत्सव यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. संगमनेरकरांनी 12 ते 16 सप्टेंबर पर्यंत विनामूल्य प्रवेश असलेल्या या एक्स्पोचा आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.  

आमदार अमोल खताळ आपल्या भाषणात म्हणाले की, लायन्स क्लब सॅफ्रॉन सफायर क्लब नेहमीच वेगळ्या संकल्पना मांडत असतो. उद्योजक, नागरिक, लहानग्यांच्या गरजा ओळखून त्यांना फन, फुड आणि शॉपिंगचा आनंद देणारा हा उत्सव एक्स्पो आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आणि गृहिणींसाठी हा एक्स्पो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. केवळ एक्स्पोच नाही तर अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रीय सहभाग असणाऱ्या लायन्स क्लबचे काम समाजासाठी आदर्शवत असून त्याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ला. सुदीप हासे यांनी केले तर आभार सेक्रेटरी सुमित मणियार यांनी मानले. तरुण, तरुणी, अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. तरी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व नागरिकांनी या एक्स्पोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प समन्वयक श्रीनिवास भंडारी यांनी केले.

प्रकल्प समितीमध्ये महेश डंग, धनंजय धुमाळ, राजेश मालपाणी, उमेश कासट, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ, अक्षय गोरले, देवीदास गोरे, जितेश लोढा, रोहित मणियार, चंद्रशेखर गाडे, अजित भोत, निलेश ओहरा, अनिरूध्द डिग्रसकर, सुमित अट्टल, कृष्णा आसावा, संतोष अभंग, डॉ. योगेश गेठे, व्यंकटेश लाहोटी, नयन पारख, अतुल कोतकर, आदित्य कडलग, धनंजय फटांगरे, सुनीता मालपाणी, नम्रता अभंग, प्रियंका कासट, चैताली जोर्वेकर, मिनल अभंग काम बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *