एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलला एनएबीएच मानांकन, आयुर्वेदातील मोजक्याच हॉस्पिटल्समध्ये एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलचा समावेश

नाशिक जिल्ह्यातील आणि इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलला नुकतेच नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त झाले. ‘एनएबीएच’ची मान्यता प्राप्त करणे या हॉस्पिटलमध्ये झालेल्या काळानुरूप बदलाची पावती असून दर्जेदार रुग्णसेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या हॉस्पिटलच्या वचनबद्धतेचा हा दाखला असल्याचे वैद्यकीय संचालक तथा प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड यांनी सांगितले. एनएबीएच मानांकन प्राप्त झाल्यानंतर ते संवाद साधत होते.  

ते म्हणाले, ‘एनएबीएच’ची मान्यता हे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीयस्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे. ही मान्यता मिळणे हा कुठल्याही हॉस्पिटलसाठी मोठा सन्मान समजला जातो. एनएबीएचची मान्यता प्रक्रिया खूप खडतर आणि सर्वसमावेशक असते. यात रुग्णांची काळजी सुरक्षितता आणि संस्थांत्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.  एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता प्राप्त केली असून आयुर्वेद आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

त्याअनुषंगाने, रुग्णालयात एनएबीएच नियमानुसार ०४ अत्याधुनिक ऑपेरेशन थिएटर, सुसज्ज प्रसुतीगृह, अत्याधुनिक आय.सी.यू विभाग, सेंटर ऑफ क्लिनिकल एक्सलन्सच्या आधारे वेगवेगळ्या विभागांची नियोजनबद्द रचना केली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये एकुण २४४ बेड्स उपलब्ध असून विशेष म्हणजे, येथील राहत या पॅलीएटिव्ह केअरच्या माध्यमातून ३० बेड्स आरक्षित ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी दुर्धर आजाराने खिळलेल्या रुग्णांवर विशेष वेदनाशामक उपचार केले जातात.

या पॅलीएटिव्ह केअर युनिटमध्ये कार्यरत असलेला सपोर्टिंग स्टाफ हा टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई येथून प्रशिक्षण घेऊन आलेला आहे. त्यामुळे रुग्णांवर अभ्यासपूर्ण आणि योजनाबध्द उपचार केले जातात. यापुढे एनएबीएच मानांकनामुळे सर्व सरकारी व निमसरकारी शासकीय आरोग्य योजना राबवता येणे सहज शक्य असल्याचेही प्रतिपादन करण्यात आले.  

एनएबीएच मानांकन का गरजेचे ?

नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेची एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करणे यासाठी करण्यात आली आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य  स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांच्या मान्यतेसह ही संस्था कुशल सहकर्मचारी घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणीकरण उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे विविध शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते.

रुग्ण सुरक्षा व दर्जेदार उपचारांवर भर

आमच्या दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या व रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एनएबीएच (NABH) मानांकन मिळणे शक्य झाले. अनेक वर्षांपासून रुग्ण सुरक्षा व दर्जेदार उपचार यावर आम्ही सातत्याने काम करत आलो आहोत. संस्था व्यवस्थापनाने सर्वांना यासाठी वेळोवेळी प्रेरणा दिली. गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने यशाला गवसणी घालता आली.

डॉ. प्रदीप भाबड,
वैद्यकीय संचालक तथा प्राचार्य
एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *